येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये खानापूर-आटपाडीचा आमदार भाजपचाच असेल असे वक्तव्य करून आ. गोपीचंद पडळकर यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार अनिल बाबर यांनाच आव्हान दिले. २०२४ मध्ये होणार्‍या निवडणुकीवेळी आ. बाबर हेच उमेदवार नसतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.

खानापूर तालुक्याच्या घाटमाथ्यावरील गावात नव्याने निवडून आलेले सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार मोही येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी मोहीसह घोटी, ताडाचीवाडी, पोसेवाडी, आसनगाव, हिवरे आदी गावातील नूतन पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आले.

yavatmal pm narendra modi marathi news, yavatmal lok sabha election marathi news, yavatmal bjp marathi news, yavatmal eknath shinde shivsena marathi news,
मोदींच्या सभेने महायुतीचा उत्साह वाढला, यवतमाळ मतदारसंघ भाजप की शिंदे गटाकडे ?
Union Home Minister Amit Shah will visit Akola on March 5 to review five constituencies in Vidarbha
लाेकसभेच्या तोंडावर अमित शाह विदर्भात, अकोल्यात ५ मार्चला पाच मतदारसंघांवर भाजपचे मंथन; शिंदे गटाच्या मतदारसंघांचा…
arun dudwadkar
कोल्हापूरातील दोन्ही मतदारसंघ ठाकरे सेनेकडे; अरुण दुधवडकर यांच्या दाव्याने संभ्रम
mahayuti ahmednagar
नगरमध्ये महायुतीत एकोप्याचा अभाव, महाविकास आघाडी संघटित

हेही वाचा >>> “कर्नाटकाच्या विधानसभा निवडणुकीसाठी कन्नडिगे अस्मितेला…”, जितेंद्र आव्हाडांचा शिंदे-भाजपा सरकारवर गंभीर आरोप

यावेळी बोलताना आ. पडळकर म्हणाले, २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी आ. बाबर आणि त्यांचे जेष्ठ चिरंजीव अमोल बाबर बारामतीमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी पुढील निवडणूक आपण लढविणार नसल्याचे सांगून यावेळी मदत करण्याचे आवाहन केले होते. तसेच २०२४ मध्ये होणार्‍या निवडणुकीमध्ये पाठीशी राहण्याचे वचन याचवेळी बाबर पितापुत्रांनी दिले होते. ही बाब त्यांच्याकडून सांगितली जाईल असे वाटत होते, मात्र, त्यांनी ही चर्चा गुलदस्त्यातच ठेवली. यामुळे मला आता जनतेला सांगावे लागत आहे. खानापूर तालुययात आडवाआडवीचे काम यापुढे  चालणार नाही, आता नव्या पिढीला अडवणुकीच्या ऐवजी विकासाचे राजकारण हवे आहे.

हेही वाचा >>> “…की थेट फाशी लावणार?” सत्तारांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून गुलाबराव पाटलांचा संतप्त सवाल

खानापूर तालुक्यातून २००९ मध्ये विधानसभा निवडणुक लढविली त्यावेळी तीन, पाच, आठ, दहा अशी मते या गावातील लोकांनी मला दिली होती. तरीही या जनतेची कामे आपण आत्मतियतेने मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. यापुढील निवडणुक भाजप ताकदीने लढविणार असून पुढील आमदार कोणत्याही स्थितीत भाजपचाच असेल असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, दोन महिन्यापुर्वी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या सत्कार समारंभावेळी आ. पडळकर यांनी गेल्या वेळी चूक केली, आता वरिष्ठांना सांगून ही चूक सुधारली जाईल असा इशारा आ. बाबर यांना दिला होता. या कार्यक्रमास आ. बाबर हेही उपस्थित होते. त्यांनी मात्र, या टीकेला थेट उत्तर न देता   कोणत्या ठिकाणी काय बोलायचे याचे संस्कार व भान आपल्याला आहे असे सांगत आ. पडळकर यांच्या संस्कारावरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित करीत आपण आ. पडळकर यांच्या बोलण्याला फारसे महत्व देत नसल्याचे  सूचित केले होते.