काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या एका वक्तव्यावरुन सध्या मोठा राजकीय वाट निर्माण झालाय. ‘मी मोदीला मारू शकतो’, ‘शिवी देऊ शकतो’, असं नाना पटोलेंनी भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथे कार्यकर्त्यांशी बोलताना म्हटलं. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपाच्या अनेक नेत्यांनी नाना पटोलेंवर तिखट शब्दांमध्ये टिका केलीय. तर दुसरीकडे नाना पटोलेंनी हा व्हिडीओ खोडसाळपणे व्हायरल केला जात असल्याचा दावा करताना आपण मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबद्दल असं म्हणालो होतो, असं स्पष्टीकरण दिलंय. सध्या या प्रकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजपा असा संघर्ष सुरु असतानाच काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल वादग्रस्त विधान केल्याने अटकेची कारवाई झालेले केंद्रीय मंत्री नाराणय राणे यांनी पहिल्यांदाच भाष्य केलंय.

नाना पटोले काय म्हणाले?
‘‘मी एवढ्या वर्षांच्या राजकारणात एकही शाळा काढली नाही किंवा ठेकेदारी केली नाही. जो आला, त्याला वाटत गेलो, म्हणूनच मोदींना मारू शकतो, शिवी देऊ शकतो. म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आले नाही,’’ असं नाना पटोले म्हणाले. त्यांच्या या विधानाची चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित झाली आहे. देशाच्या पंतप्रधानांच्या विरोधात पटोले यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे राजकीय वर्तुळात वादळ उठले असून यामुळे ते अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

devendra fadnavis reaction on Firing at Salman Khan galaxy apartment in mumbai
सलमान खानच्या घरावर गोळीबार, फडणवीस म्हणाले “विरोधकांनी…”
AAP leader Atishi accused the central government of a conspiracy of President rule in Delhi
दिल्लीत राष्ट्रपती राजवटीचा कट! ‘आप’च्या नेत्या आतिशी यांचा केंद्र सरकारवर आरोप; भाजपचे प्रत्युत्तर
Proposal of friendly fight in Bhiwandi rejected by Congress seniors
भिवंडीत मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव काँग्रेसच्या वरिष्ठांकडून अमान्य
uddhav thackeray criticized pm narendra modi
“काश्मीर ते मणिपूरपर्यंत खदखद अन् हिंसाचार, तरीही भारतीय नीरोचे…”; ‘त्या’ दाव्यावरून ठाकरे गटाची पंतप्रधान मोदींवर टीका!

मोदींबाबत पटोलेंचे वादग्रस्त वक्तव्य

राणे काय म्हणाले?
“महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधानांबद्दल वक्तव्य करताना वापरलेल्या आपत्तिजनक भाषेचा मी निषेध करतो. काँग्रेसचे नेते या स्तरापर्यंत खाली जातील याचं मला आश्चर्य मला वाटत नाही,” असं राणे ट्विटवरुन प्रतिक्रिया देताना म्हणालेत. त्यांनी या ट्विटमध्ये पंतप्रधान मोदींबरोबर भाजपा, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनाही टॅग केलंय. अन्य एका ट्विटमध्ये नारायण राणेंनी, “आता पोलिसांची जबाबदारी आहे की त्यांनी पटोलेंनी अटक करावी. हा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मुद्दा आहे,” असं म्हटलंय.

फडणवीसांचाही टोला
सर्वच राजकीय पक्षांकडून पटोले यांच्या विधानाची निंदा केली जात आहे. भाजपा नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत पटोलेंच्या विधानाचा समाचार घेतला. पंजाबमध्ये पाकिस्तानच्या सीमेलगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाहनाचा ताफा २० मिनिटे खोळंबून राहतो, पण तेथील काँग्रेसचे मुख्यमंत्री साधी दखलसुद्धा घेत नाहीत. आता महाराष्ट्राचे काँग्रेस अध्यक्ष मी मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो.. असं विधान करतात. काँग्रेस पक्षाचे चालले तरी काय? कधी काळी स्वातंत्र्याच्या आंदोलनात असणारा हा पक्ष इतक्या रसातळाला गेला. काँग्रेसला आता लोकशाहीतील राजकीय पक्ष म्हणायचे की दहशत पसरवणारी संघटना, असा सवाल फडणवीस यांनी केला आहे.

“मी त्या गावगुंड मोदीबद्दल बोललो आहे”; व्हायरल व्हिडीओवर नाना पटोलेंचे स्पष्टीकरण

गडकरीही संतापले…
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील नाना पटोलेंच्या वक्तव्यावरुन नाराजी जाहीर करत ट्वीट केलं आहे. नाना पटोलेंना अटक केली जावी अशी मागणी नितीन गडकरी यांनी केली आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वापरलेली भाषा अतिशय आक्षेपार्ह व निंदनीय आहे. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, की पटोलेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी,” अशी मागणी नितीन गडकरी यांनी केली आहे.

काँग्रेसने फेटाळले आरोप
दरम्यान, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मात्र पटोले यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. पटोले यांचे विधान पंतप्रधान मोदी यांच्यासंदर्भातील नव्हते, असा दावाही त्यांनी केला. पटोले हे भाषण देत नव्हते तर ते लोकांच्या गराडय़ात होते. लोक तक्रारी करीत होते. भंडारा जिल्ह्यात ‘मोदी’ असे टोपण नाव असलेला गावगुंड आहे. त्याच्यासंदर्भात ते बोलले. शिव्या देणे, मारणे, संपवणे हे काँग्रेसची संस्कृती नाही. ती भाजपाची संस्कृती आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपाच्याच कार्यकर्त्यांनी पटोले यांच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला केला होता. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना भाजपने ‘चोर’ म्हटले होते. काल चंद्रकांत पाटील हे संजय राऊत यांच्याबद्दल काय बोलले हे सर्व महाराष्ट्राने बघितले, याकडे लोंढे यांनी लक्ष वेधले.

नाना पटोलेंचे स्पष्टीकरण…
“जे काही वक्तव्य माझ्या नावाने दाखवले जात आहे त्यामध्ये लोक माझ्या सभोवताली गोळा झालेले आहेत. सध्या आमच्या जिल्ह्यामध्ये निवडणुका सुरु आहेत. निवडणुकांच्या प्रचारामध्ये एका मोदी नावाच्या गावगुंडाची तक्रार लोक मला करत होते. त्या गावगुंडाला मी बोलूही शकतो आणि मिळाला तर मारुही शकतो. तुम्हाला घाबरण्याचे कारण नाही. मी त्या गावगुंड मोदीबद्दल बोललो आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल नाही,” अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.