भारतीय जनता पार्टीचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. उगवत नाही, फुलत नाही आणि वासही येत नाही, असा चाफा फक्त मातोश्रीत आहे. बाकी कुठेही नाही, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते. उद्धव ठाकरे यांना आपण मागील ३९ वर्षांपासून ओळखतो, अगदी लहान असल्यापासून त्यांना पाहिलं आहे. त्यांना काहीही येत नाही, असंही नारायण राणे म्हणाले.

घटनास्थळी उपस्थितीतांना संबोधित करताना नारायण राणे म्हणाले की, आशिष शेलार हे एक कवी पण आहेत. ते बोलता बोलता चाफा उगवेना, चाफा फुलेना असं बोलून गेले. पण उगवत नाही, फुलत नाही आणि वासही येत नाही, असा चाफा फक्त मातोश्रीत आहे. बाकी कुठेही नाही, अशी टीका राणेंनी केली आहे.

हेही वाचा- “होय, त्याला फोन केला, पण…” चेंबुरच्या व्यापाऱ्याला धमकावल्याप्रकरणी छगन भुजबळांचं स्पष्टीकरण, म्हणाले…

उद्धव ठाकरेंना उद्देशून राणे पुढे म्हणाले की, त्या माणसाला अडीच वर्षे मिळाली होती. पण हे सगळं महाराष्ट्र कसं सहन करत होता? हेच मला कळत नाही. त्या माणसाला काहीच येत नाही. मी ३९ वर्षे त्या माणसाला जवळून पाहिलं आहे. अगदी लहान असल्यापासून पाहिलं आहे. त्याला काहीही येत नाही, असंही नारायण राणे म्हणाले.

हेही वाचा- “आमचं दुबई कनेक्शन आहे, तुला…” भुजबळांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर तक्रारदाराने सांगितला घटनाक्रम

या कार्यक्रमात सत्कार करताना नारायण राणे यांना ‘पुरुषार्थ’ नावाचं पुस्तक भेट देण्यात आलं. यावरूनही राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. हे पुस्तक मला नाही, उद्धव ठाकरेंना दिलं पाहिजे, असं राणे म्हणाले.