सावंतवाडी : राज्याचे सरकार हे अधोगतीकडे गेले आहे. त्यांनी खुर्ची सोडावी. सरकारचे प्रमुख आणि मंत्री यांना विकासाचा दृष्टिकोन नाही विकास करण्यासाठी सोर्सेस कसे वापरायचं याचं ज्ञान नाही,असा टोला हाणला. त्यामुळे या सरकारकडून जनतेला अपेक्षा नाहीत. राज्याची परिस्थिती दयनीय आहे असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद सांगितले. गेले २२ वर्ष केसरकर यांच्याकडे नगरपरिषद सत्ता होती. त्या बिनडोक केसरकर सारख्या मी टपऱ्या नाही तर उद्य्ोग उभारणार आहे असे ते म्हणाले. राज्याच्या उद्य्ोग मंत्र्यांच्या मुलाला आडाळी एमआयडीसीची चिंता नाही तर जमीन विकण्यास रस आहे असा आक्षेप केला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, नगराध्यक्ष संजू परब, सभापती सुधीर आरीवडेकर व नगरसेवक उपस्थित होते यावेळी राणे म्हणाले, गेले बावीस वर्ष सावंतवाडी नगर परिषदेमध्ये ताब्यात होती हे आमदार पालकमंत्री राज्यमंत्री झाले मात्र त्यांनी शहराचा विकास केला नाही.या भागात उद्योग रोजगार वाढवावा या साठी माझे प्रयत्न राहतील असे आणि म्हणाले. महिलांना अगरबत्ती,काथ्या उद्य्ोग निर्माण करून दिले जातील.

केंद्रीय मंत्री राणे म्हणाले,कोकण रेल्वेच्या साईडला सिंगापूरची झाडे, आसामचे बांबू देखील लावले जातील याचा उपयोग अगरबत्तीला होईल. उत्तम स्टील प्रकल्प किंवा आडाळी एमआयडीसी विकासात शिवसेना आड आली आहे. मोपा विमानतळ  झाले तरी चिपी विमानतळावर कोणताही परिणाम होणार नाही याची आपण खबरदारी घेऊ. चिपी विमानतळ ३४ हजार मिटर रनवे होता तो माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी अडीच हजार केला तरीही तो पुन्हा वाढवण्यासाठी आपला प्रय राहील

कुडाळ,माजगाव एमआयडीसी बाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, लघू मध्यम आणि मोठय़ा प्रकल्पांसाठी तरुणांनी पुढे यावे एक कोटी, अडीच कोटी, पन्नास कोटी भाग भांडवल प्रकल्प उभे करण्यासाठी आपण आवश्यक ते मशिनरी सह सर्व मार्गदर्शन आपल्या विभाग करेल.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मत्स्य प्रक्रिया, कुक्कुटपालन अशा छोटय़ा मोठय़ा प्रकल्पासाठी आपला विभाग निश्चित प्रयत्न करेल. बांदा संकेश्व्र या राष्ट्रीय महामार्गाची माहिती घेऊन आपण बोलेन असे ते म्हणाले. प्रचंड महागाईमुळे लोकांचे दिवाळे निघाले आहे त्या प्रश्नावर उत्तर देताना राणे म्हणाले, कोणत्याही सरकारला महागाईची चिंता असते पण पेट्रोल डिझेल उत्पादन आपल्या कडे होत नाही त्यामुळे महागाई वाढली आहे.