लोकसभा निवडणुकीत माझा पराभव झाल्याने निराश झालेले लोक स्वतःचे प्राण देत आहेत. लोकांनी माझ्यासाठी प्राण दिले त्यामुळे मला अपराधी वाटतं आहे. एरवी मी हिंमतीने लढणारी आहे. मात्र या सगळ्या गोष्टींमुळे मी डगमगून गेले आहे असं पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे. पंकजा मुंडेंनी सोमवारी डिघोळ या ठिकाणी पांडुरंग सोनावणेंच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. बीड लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा पराभव झाल्याने पांडुरंग सोनावणे यांनी नैराश्याच्या भरात गळफास घेतला आणि आयुष्य संपवलं. आज त्यांच्या कुटुंबाची पंकजा मुंडेंनी भेट घेतली. त्या चांगल्याच भावूक झाल्या होत्या.

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

“मी हिंमतीने लढणारी आहे. मात्र ज्या गोष्टी घडत आहेत त्यामुळे मी डगमगले आहे. या कुटुंबाच्या मागे मी उभी राहणार आहे. मात्र आत्महत्येसारख्या गोष्टींना मी पाठिंबा देणार नाही. आपल्या लहान लेकरांना, कुटुंबाला वाऱ्यावर सोडून देऊन कुणीही आत्महत्या करु नये. माझी तु्म्हाला सगळ्यांना विनंती आहे. तुमचं प्रेम जरुर व्यक्त करा, पण आपला जीव गमावू नका. तुमचा जीव म्हणजे माझा जीव आहे असं समजून तो जपा. तुम्हाला शपथ आहे या निराशेतून बाहेर या. जसा नेता असतो तसा कार्यकर्ता असला पाहिजे. तुमचा आक्रोश आणि प्रेम तुमच्या वर्तणुकीतून, कामातून आणि कष्टांतून व्यक्त करा.” असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

uddhav thackeray prakash ambedkar (2)
“गरज सरो वैद्य मरो”, प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर आक्षेप; म्हणाले, “तुमचे पक्ष वाचवण्यात…”
Sushma andhare
“देवेंद्र फडणवीसांचा चेहरा दाखवून…”, सुषमा अंधारेंचा गंभीर दावा; म्हणाल्या, “त्यांची वाढती नकारात्मक छबी…”
Bacchu Kadu Vs Ravi Rana
“पराभवाचा कट हा युवा स्वाभीमानी पक्षाचाच”, बच्चू कडू यांचं रवी राणांना प्रत्युत्तर; म्हणाले, “नवनीत राणांनी सुनावलं म्हणून…”
Prithviraj Chavan Uddhav Thackeray
“धडा घेणं गरजेचं”, सांगलीच्या जागेवरून पृथ्वीराज चव्हाणांचा उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला; म्हणाले, “कार्यकर्त्यांच्या विरूद्ध…”
Pankaja Munde on obc reservation protection
“ओबीसींच्या आरक्षणाला कसा धक्का लागणार नाही हे सांगा”, पंकजा मुंडेंनी सरकारला विचारला जाब; म्हणाल्या, “मराठा आरक्षणाला…”
Chhagan Bhujbal and Manoj Jarange
“छगन भुजबळांना काही दिवसांनी बैलाच्या गोळ्या द्याव्या लागणार, मोठं इंजेक्शन…”, मनोज जरांगेंचा संताप; म्हणाले, “कितीही आडवे या…”
South African fans object to Surya's catch
सूर्यकुमार यादवच्या ‘कॅच’वरुन पेटला नवा वाद, दक्षिण आफ्रिकन चाहत्याने VIDEO शेअर करत केला फसवणूक झाल्याचा दावा
pankaja munde manoj jarange
पंकजा मुंडेंच्या विधान परिषदेच्या उमेदवारीला मनोज जरांगेंचा विरोध? सूचक वक्तव्य करत म्हणाले…

पंकजा मुंडे ढसाढसा रडल्या, कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाल्या; “असं पाऊल उचललंत तर मी राजकारण…”

निराशेतून बाहेर या

“माझी तुम्हाला शपथ आहे की, या निराशेतून बाहेर या. जसा नेता असतो तसा कार्यकर्ता असला पाहिजे. राजकारणात जय-पराजय हे सुरु असते. पण सध्या राजकारण ज्या पद्धतीने आकार घेत आहे, त्यामुळे लोक निराशेच्या गर्तेत कोसळत आहेत. आम्ही कमी आहोत, आम्ही राजकारणाच्या प्रवाहात काहीच बदलू शकत नाही, असा न्यूनगंड लोकांमध्ये तयार होत आहे. ज्या पद्धतीने राजकारण बदलत आहे, या भावना लोकांना आक्रोशाकडे नेत आहेत”, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले.

गणेश बडे आणि पोपटराव वायभासे या दोघांच्या आत्महत्या

पंकजा मुंडे यांच्या पराभवामुळे चिंचेवाडी येथील तरुण पोपटराव वायभासे यांनीही आत्महत्या केली. पोपटराव वायभासे यांनाही पंकजा मुंडेंचा पराभव सहन झाला नाही. गणेश बडे यांच्याप्रमाणेच त्यांनीही त्यांचं आयुष्य संपवलं. पंकजा मुंडेंनी या कुटुंबाचीही भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं. त्यावेळी त्यांना रडू कोसळलं होतं.

पंकजा मुंडे यांच्या विरोधात बजरंग सोनावणे विजयी

बीडमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे यांच्यात शेवटच्या फेरीपर्यंत अत्यंत अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. या लढतीचा निकाल राज्यात सर्वात शेवटी लागला. त्यामध्ये, पंकजा मुंडेंचा सहा हजार मतांनी पराभव झाला. त्यामुळे, पंकजा मुंडेंच्या समर्थकांची मोठी नाराजी झाली. आपल्या नेत्या पंकजाताईंचा पराभव झाल्याने अनेकांनी मतदार मतमोजणी केंद्रावरच अश्रू ढाळले. तर, बीड जिल्ह्यात या पराभवाचे पडसादही पाहायला मिळाले. काही ठिकाणी आत्महत्यासारख्या घटना घडल्या. आष्टी तालुक्यातील एका युवकाने पराभव सहन न झाल्याने जीवन संपवले. त्याच आष्टी तालुक्यातील पीडित कुटुंबीयांच भेट घेऊन पंकजा मुंडेंनी अश्रू पुसले. दरम्यान, बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनीही या पोपटराव वायभासे तरुणाच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले होते. तसेच, पीडित कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही त्यांनी उचलली आहे.