माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी थेट भाजपात प्रवेस केला. त्यांना भाजपाने राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. दरम्यान, चव्हाण यांच्या भाजपाप्रवेशानंतर काँग्रेसचे अनेक नेते आणि आमदार भाजपात जाणार आहेत, असा दावा केला जातोय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी ‘आगे आगे देखो होता है क्या’, असे विधान करून भविष्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार असल्याचे संकेत दिले आहेत. असे असतानाच आता माजी मंत्री आणि भाजपाचे नेते परिणय फुके यांनी मोठे विधान केले. लवकरच काँग्रेसचे १६ ते १७ आमदार भाजपात प्रवेश करणार आहेत, असे ते म्हणाले. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

“१६ ते १७ आमदार भाजपात येणार”

“मला असं वाटतंय की अशोक व्हाण यांच्यानंतर काँग्रेसचे १६ ते १७ आमदार भाजपात प्रवेश करतील. यासंदर्भात अशोक चव्हाण यांच्यासोबत अनेक बैठका झाल्या आहेत. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्यासोबत जे-जे होते ते सर्वजण भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार आहेत,” असे परिणय फुके म्हणाले.

congress in gujarat loksabha
गुजरातमधील काँग्रेसचे ‘जायंट-किलर’ रूपालांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात; भाजपाचं गणित बिघडणार?
mamata banerjee
‘काँग्रेस, कम्युनिस्ट हे भाजपाचे एजंट’, ममता बॅनर्जी इंडिया आघाडीवर कडाडल्या
Congress, Nana Patole car accident,
“विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपाला निवडणूक जिंकायची आहे का?”, नाना पटोलेंच्या अपघातावरून काँग्रेसचा सवाल
hema malini and yogi
‘काँग्रेसचे मानसिक संतुलन ढळले’; हेमा मालिनी यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह विधानांनंतर भाजपची टीका

“नेत्यांना राहुल गांधींचे नेतृत्व मान्य नाही”

काँग्रेस तसेच राहुल गांधी यांच्यावर कोणाचाही विश्वास राहिलेला नाही. काँग्रेसला कोठेही जनाधार नाही. दुसरं म्हणजे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला त्यांचेच आमदार विरोध करतात. म्हणूनच आमदार मोठ्या प्रमाणात भाजपात प्रवेश करणार आहेत, असेही फुके म्हणाले.

“काँग्रेसच्या आमदारांशी एक बैठक झाली”

काँग्रेसकडून मात्र आमचा एकही आमदार फुटणार नाही, असा दावा केला जात आहे. एक नेता गेला म्हणजे पूर्ण पक्ष संपला असे होत नाही. आमचे सर्व आमदार आमच्या संपर्कात आहेत. आमचा पक्ष सोडून कोणीही जाणार नाही, असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले होते. यावरही परिणय फुके यांनी प्रतिक्रिया दिली. “प्रत्येक नेता असेच सांगत असतो. त्यामळे नाना पटोले जे बोललं असतील त्यात काही आश्चर्य नाही,” असे फुके म्हणाले. तसेच “काँग्रेसच्या आमदारांची एक बैठक झाली आहेत. अजूनही बैठकी चालू आहेत. मी सांगतो की १६ ते १७ आमदार भाजपात प्रवेश करतील,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.