उद्धव ठाकरे गटातील आमदार वैभव नाईक यांची रत्नागिरीतील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू आहे. याच चौकशीच्या निषेधार्थ १८ ऑक्टोबर रोजी कुडाळ येथे रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये उद्धव ठाकरे गटातील नेते भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री तथा भाजपाचे नेते नारायण राणे, आमदार नितेश राणे यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली होती. त्यांच्या याच टीकेला आता भाजपाकडून संविधान बचाव रॅलीच्या माध्यमातून उत्तर देण्यात आले. या रॅलीत भाजपाचे नेते प्रसाद लाड यांनी भास्कर जाधव आणि उद्धव ठाकरे यांचा बदला घेतल्याशिवाय गप्प राहायचे नाही, अश निर्वाणीची भाषा केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> दिवाळीनिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे पत्र; म्हणाले, “माझ्या शिवाजी पार्कमधील शेजाऱ्यांनो…”

“संविधान बचाव रॅलीच्या माध्यमातून आम्ही ज्यांनी आणीबाणी रॅली काढली त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करत आहोत. कसली आणीबाणी रॅली काढता. तुम्ही चिंधीचोर आहात. तुमच्यावर चोरीचे गुन्हे आहेत. आपण त्यांचे नावही घ्यायला नको. आपण वैभव नाईक यांचे नाव चिंधीचोर ठेवुया. तर भास्कर जाधव यांचं नाव आयटम गर्ल ठेवुया. मी भास्कर जाधव यांचं भाषण ऐकलं. ते खूप नाटक करतात. चित्रा वाघ यांनी त्यांच्यावर योग्य टीका केली आहे. या लोकांची नावे घेऊन आपण त्यांना मोठं करायचं नाही,” अशी घणाघाती टीका प्रसाद लाड यांनी केली.

हेही वाचा >>> फोन टॅपिंग प्रकरण : रश्मी शुक्लांना दिलासा मिळाल्यानंतर एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अलीकडच्या काळात…”

“चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालावा म्हणून एक आयटम साँग असते. अगदी तशाच प्रकारे उद्धव ठाकरे यांचे भास्कर जाधव हे आयटम गर्ल आहेत. ते विधानसभेत एक बोलतात. बाहेर एक बोलतात. एवढीच ताकद होती, तर तुम्हाला (भास्कर जाधव) उद्धव ठाकरे यांनी मंत्री का केले नाही. भास्कर जाधव उदय सामंत यांच्या पाया पडत होते. आज ते आम्हाला शिकवत आहेत. उद्धव ठाकरे आणि भास्कर जाधव यांचा बदला घेतल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही,” असे प्रसाद लाड म्हणाले.

हेही वाचा >>> “कोणीतरी बावनकुळेंना उपचारांसाठी…”; ‘घड्याळ बंद पाडू’ टीकेवरुन राष्ट्रवादीचा भाजपा प्रदेशाध्यक्षांना टोला

“उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांना जेवणाच्या ताटावरून उठवून अटक केले. तेव्हा नारायण राणे भाजपासोबत असते तर निलेश राणे आज खासदार असते. वैभव नाईक यांच्याविरोधात तक्रार करणारे आम्ही नव्हतो. गुन्हा दाखल झाला असेल तर त्यांनी चौकशीला सामोरे जायला हवे. वैभव नाईक हे लोकांच्या पैशावर मोठे झाले आहेत. १० वर्षांत संपत्ती ३०० पटीने वाढू शकते का? याचे उत्तर त्यांनी द्यायला हवे,” असे म्हणत प्रसाद लाड यांनी वैभव नाईक आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

हेही वाचा >>> रश्मी शुक्ला यांना दिलासा! अवैध फोन टॅपिंग प्रकरणात राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

“संजय राऊत, नवाब मलिक हे सध्या तुरुंगातच आहेत. अनिल देशमुख हेदेखील तुरुंगातच आहेत. नारायण राणे यांच्या पाठीमागे आम्ही ताकदीने उभे राहू. नारायण राणे हे भाजपाचे नेते आहेत. त्यांना आमची पूर्ण साथ असेल. भास्कर जाधव जे बोलतील त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. सिंधुदुर्गात आपल्याला आपली ताकद वाढवायची आहे,” असे म्हणत त्यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आवाहन केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader prasad lad criticizes bhaskar jadhav vaibhav anik and uddhav thacekray for opposing narayan rane prd
First published on: 21-10-2022 at 13:58 IST