राज्याच्या राजकारणात सध्या राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (३० जुलै) अकोल्यात अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला केला. यानंतर मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांमध्ये एकमेकांवर टीका-टिप्पणी सुरु झाली आहे. त्यामुळे राजकारण तापलं आहे.

या सर्व घडामोडी संदर्भात भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी भाष्य केलं. “सध्या राजकीय पक्षांचे प्रवक्ते काहीही वक्तव्य करत आहेत”, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे त्यांच्या या विधानाचा रोख नेमकं कुणाकडे होता? याबाबत आता तर्कवितर्क लावले जात आहेत.

sharad pawar
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेशासाठी महायुतीच्या नेत्यांची रीघ
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
maha vikas aghadi allies creating trouble for rohit pawar in Karjat Jamkhed constituency
कारण राजकारण : रोहित पवारांच्या कोंडीचे मित्रपक्षांकडूनच प्रयत्न
Ajit Pawar, NCP, Vidarbha, Ajit Pawar and Vidarbha,
Ajit Pawar : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत विदर्भात धुसफूस, ‘हे’ आहे कारण
BJP worried about defection before Legislative Assembly seat allocation in Maharashtra
महाराष्ट्रात जागावाटपापूर्वी भाजपला पक्षांतराची चिंता? २३ जागांवर राष्ट्रवादी अजित पवार गटाविरुद्ध भाजपमध्ये नाराजी का?
Absence of Shiv Sena Thackeray faction at Vishwajit Kadam rally in Sangli
सांगलीतील कदमांच्या मेळाव्याकडे शिवसेना ठाकरे गटाची पाठ
Uddhav Thackeray, Sangli meeting, Shivsena,
सांगलीच्या मेळाव्याकडे उद्धव ठाकरे यांची पाठ, शिवसेना जाणीवपूर्वक दूर
Devendra Fadnavis Eknath Shinde Ajit Pawar X
Mahyuti Disruption : तानाजी सावंतांपाठोपाठ भाजपा नेत्याची राष्ट्रवादीवर टीका; म्हणाले, “त्यांच्यामुळे आमचं वाटोळं…”, महायुतीत धुसफूस चालूच

हेही वाचा : “दोन ते तीन दिवस थांबा, मोठा पर्दाफाश करणार”, मनोज जरांगेंचं सूचक विधान

रावसाहेब दानवे काय म्हणाले?

“अशा प्रकारची वक्तव्य अनेक नेत्यांकडून सध्याच्या परिस्थितीत होत आहेत. दोन्हीही बाजूने अशा प्रकारची वक्तव्य करणं टाळलं पाहिजे. या राज्यामध्ये हिंसाचार होऊ नये, यासाठी सर्व राजकीय पक्षांनी काम करणं गरजेचं आहे. मात्र, काही राजकीय पक्षाचे नेते किंवा प्रवक्ते अशा प्रकारची विधाने करतात. तसेच शिवसेना ठाकरे गटाकडून तर रोज-रोज अशा प्रकारचे वक्तव्य समोर येत आहेत. त्याचाच हा परिणाम आहे, असं मला वाटतं”, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं.

मनसे विरुद्ध राष्ट्रवादी असा वाद का रंगला?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पुण्यात बोलताना टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. तसेच अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करताना सुपारीबाज असा उल्लेख केला होता. मिटकरी यांनी राज ठाकरेंवर केलेलं हे विधान मनसे कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागलं.

यानंतर अकोल्यातील मनसैनिकांनी आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला करत त्यांच्या गाडीची तोडफोड केली. या प्रकरणात काही जणांना अटकही करण्यात आली. यानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्यावर झालेल्या हल्ल्याला राज ठाकरे हे जबाबदार असल्याचा आरोप केला होता. तसेच हल्ला करणाऱ्या कार्यकर्त्यांसह राज ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती. दरम्यान, राज्याच्या राजकारणात सध्या मनसे विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरु असून एक प्रकारे मनसे विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट असा वाद रंगला आहे. यावर आता सत्ताधारी पक्षाचे नेते आणि विरोधी पक्षाचे नेते प्रतिक्रिया देत आहेत. याच पार्श्वभूमीवर बोलताना भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी खासदार रावसाहेब दानवे यांनीही सूचक विधान केलं आहे.