राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतंच अदाणी समूहाचे प्रमुख गौतम अदाणी यांच्यावर झालेल्या आरोपांबद्दल मतप्रदर्शन केलं. हिंडेनबर्ग कंपनीला आपण ओळखतही नाही. हिंडेनबर्गच्या अहवालात गौतम अदाणी यांना लक्ष्य करण्यात आलं असं दिसतंय, असं विधान शरद पवारांनी केलं. शरद पवार यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, भारतीय जनता पार्टीचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मोठं विधान केलं. अदाणी प्रकरणावर भाष्य करताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “अदाणीला मोठं करण्याचं काम तर काँग्रेसने केलं आहे. चिमणभाई पटेल हे दुसऱ्या पक्षाचे मुख्यमंत्री नव्हते, ते काँग्रेसचे मुख्यमंत्री होते. चिमणभाई पटेल यांनी १९९३ मध्ये गुजरातच्या कच्छमध्ये अदाणींना १० पैसे प्रतिमीटर दराने जमीन दिली. छबीलदास मेहता हेही काँग्रेसचे मुख्यमंत्री होते, त्यांनी मुंद्रा बंदर अदाणींना दिलं.”

controversy, nitin Gadkari photo, agitation of congress, nagpur
मतचिठ्ठीवर गडकरींचे छायाचित्र, नागपुरात भाजप- काँग्रेसमध्ये वादावादी !
Difference Between Congress And BJP Manifestos Sankalp patra Nyay Patra
काँग्रेसच्या ‘महालक्ष्मी योजने’ला भाजपाकडून ‘लखपती दीदी’चं प्रत्युत्तर; काय आहेत जाहीरनाम्यात महिलांसाठीच्या योजना
Conspiracy of sugar mills owners against me Raju Shettys allegation
माझ्या विरोधात साखर कारखानदारांचे षडयंत्र; राजू शेट्टी यांचा आरोप
Complaint against Fadnavis
फडणवीस व भाजप उमेदवार राम सातपुतेंविरुद्ध आचार संहिता भंग केल्याची तक्रार, मोची समाजाला प्रलोभन दाखविण्याचा आरोप

हेही वाचा- शरद पवारांनी अदाणींबाबत विधान केल्यानंतर अजित पवारांनी मांडली थेट भूमिका; म्हणाले, “त्यांची भूमिका…”

मुनगंटीवार पुढे म्हणाले, “आज राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी गौतम अदाणी यांच्याबरोबर ४८ हजार कोटींचा करार केला. महाराष्ट्रात जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं, तेव्हा त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, अदाणींना हजारो कोटी रुपये दिले. म्हणजे तुम्ही (काँग्रेस) जेव्हा मदत करता तेव्हा गडबड नाही, आणि जर कायद्याच्या चौकटीत राहून एखादं कंत्राट अदाणींना मिळत असेल तर ते गडबडीचं आहे, असं म्हणणं अभ्यासाचा विषय आहे.”

हेही वाचा- “…तर शरद पवारांची भूमिका त्यांना लखलाभ”; अदाणी प्रकरणावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

“गौतम अदाणींवर दुसऱ्या देशाच्या कंपनीने आरोप केले आहेत. याची चौकशी आता सुप्रीम कोर्टाने राबवली आहे. मग आता एक चौकशी अहवाल तरी येऊ द्या, मग त्यामध्ये काही असत्य असेल, त्यामध्ये काही चुका असतील, तर त्यावर कायदेशीर कारवाई होईलच. यामध्ये कुठेही दुमत नाही. त्यामुळे शरद पवार यांचं भाष्य अतिशय बोलकं आहे. सुप्रीम कोर्टाची चौकशी सुरू असताना दुसरी चौकशी करण्याची आवश्यकता काय आहे?” असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले. त्यांनी एक व्हिडीओ जारी करत हे विधान केलं आहे.