लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महाराष्ट्रामध्ये चांगलं यश मिळवलं. महाविकास आघाडीला तब्बल ३० जागा जिंकण्यात यश आलं. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. मात्र, या पत्रकार परिषदेला नाना पटोले हजर नव्हते. तसेच यावेळी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा पक्षात घेणार नाही, अशी भूमिका स्पष्ट केली. यावर आता भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. “आजकाल राजकारणाची गॅरंटी २४ तासांची झाली असून २४ तासानंतर निर्णय वेगळे असू शकतात”, असं सूचक विधान करत मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना टोला लगावला. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?

“आज महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे काही मोठे नेते उपस्थित नव्हते. त्यांना ज्यावेळी विचारणा केली तेव्हा त्यांना निमंत्रणच दिलं नव्हतं. आता महाविकास आघाडीची येथून सुरुवात आहे. त्यामुळे विधानसभेची निवडणूक हईपर्यंत अजून काय काय पुढे येईल हे पाहावं लागेल”, असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला.

delhi hc reserves order on cm arvind kejriwal s bail plea in cbi case
अटकेविरोधातील निर्णय राखीव;अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर २९ जुलैला सुनावणी
aspirants, Suresh Khade, Sangli,
सांगलीत पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या विरोधात इच्छुकांची संख्या वाढली
mukhyamantri majhi ladki bahin yojana extended till august 31
मुख्यमंत्र्यांच्या ‘लाडक्या बहिणीं’नी धरली माहेरची वाट , काय आहे कारण ?
supriya shrinate replied to jagdeep dhankhar
“मर्यादा विरोधकांनी नाही, तर मोदींनी सोडली”, जगदीप धनखड यांच्या ‘त्या’ विधानाला सुप्रिया श्रीनेत यांचे प्रत्युत्तर!
Kangana Ranuat and Ravi kishan slams rahul gandhi
“राहुल गांधींचे भाषण म्हणजे स्टँडअप कॉमेडी…”, खासदार कंगना रणौत, रवि किशन यांची टीका
ajit pawar suresh dhas
“…अन् मी कपाळावर हात मारला”, अजित पवारांनी सांगितला आमदार सुरेश धस यांच्या दुसऱ्या लग्नाचा किस्सा
Nitishkumar
“…म्हणून नितीश कुमारांनी पंतप्रधान मोदींकडे महत्त्वाची खाती मागितली नाही”; प्रशांत किशोर यांनी सांगितलं कारण!
chhagan bhujbal latest news
चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ विधानावर छगन भुजबळांनी व्यक्त केली नाराजी; म्हणाले, “बोलताना जरा…”

हेही वाचा : “जनतेनं त्यांना माझी पात्रता दाखवली”, बजरंग सोनवणेंचा धनंजय मुंडेंना इशारा; म्हणाले, “विधानसभेला आणखी एक विकेट…”

प्रणिती शिंदेंच्या आरोपावर मुनगंटीवार काय म्हणाले?

सोलापुरात जातीय दंगल घडविण्याचा भाजपवाल्याचा डाव होता असं खळबळजनक विधान खासदार प्रणिती शिंदे यांनी केलं. त्या विधानावर बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “प्रणिती शिंदेंनी आरोपाची माहिती पोलिसांना द्यावी. आता माहिती पोलिसांना न देणं हे सुद्धा घातक आहे. जर तुमच्याकडे दंगल घडवण्याबाबत काही माहिती होती किंवा आताही असेल तर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये दिली पाहिजे. मग तुम्ही ही माहिती पोलिसांना न देता पत्रकारांना देता. म्हणजे तुम्ही फक्त अशा प्रकारचे विधानं करून सनसनाटी निर्माण करत असाल तर हे लोकशाहीला घातक आहे. अशा लोकांची कसून चौकशी केली पाहिजे”, असं मुनगंटीवार म्हणाले.

महायुतीत मोठा भाऊ कोण?

शिवसेना शिंदे गटाचे काही आमदार म्हणत आहेत की, आमचा स्ट्राईक रेट चांगला राहिला आहे. त्यामुळे आम्ही मोठे भाऊ आहोत. त्यावर मुनगंटीवार म्हणाले, “याबाबत मला माहिती नाही. पण हे वाक्य एकनाथ शिंदे यांनी आजपर्यंत कधीही वापरलं नाही. एखादा व्यक्ती उत्साहात येवून हे म्हणत असेल तर ती शिवसेना शिंदे गटाची भूमिका असू शकत नाही”, असं मुनगंटीवार म्हणाले.

आजकाल राजकारणाची गॅरंटी…

‘जे पक्ष सोडून गेले, त्यांना पुन्हा पक्षात घेणार नाही’, अशी भूमिका उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी स्पष्ट केली. यावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले, “त्यांना माहिती आहे की ते आता येणार नाही आणि हेही घेणार नाही. त्यामुळे हा प्रश्नच उपस्थित होत नाही. आजकाल आपल्या म्हणण्याचं किंवा आपण जे वाक्य बोलतो त्याची एक्स्पायरी डेट राजकारणात २४ तासांची राहिली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या भाष्यांची एक्स्पायरी डेट हे २४ तासांची आहे”, असं सूचक विधान मुनगंटीवार यांनी केलं.