Vasant Deshmukh Vs Jayashree Thorat : भाजपाचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावात शुक्रवारी (२५ ऑक्टोबर) युवा संकल्प मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात सुजय विखे पाटील यांचे समर्थक वसंत देशमुख यांनी त्यांच्या भाषणात काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या डॉ. जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. देशमुखांच्या वक्तव्यामुळे संगमनेरमध्ये जाळपोळ झाल्याची घटना घडली होती. तालुक्यात तणाव निर्माण झाला होता. विखे आणि थोरात यांच्यातील आरोप-प्रत्यारोपामुळे राजकारण तापलेलं असतानाच वसंत देशमुखांना पोलिसांनी ताब्यात घ्यावं यासाठी जयश्री थोरात व इतर नेत्यांना आंदोलन करावं लागलं.

दरम्यान, वसंत देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शनिवारी (२६ ऑक्टोबर) वसंत देशमुखांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र तेव्हापासून ते फरार होते. त्यानंतर जयश्री थोरात यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं होतं. त्यानंतर आता स्थानिक गुन्हे शाखेने वसंत देशमुख यांना पुण्यातून ताब्यात घेतलं आहे. तत्पूर्वी बाळासाहेब थोरात यांनी आरोप केला होता की “वसंत देशमुखांना लपवून ठेवलं आहे, त्यांना फरार केलं आहे”. अखेर आज पोलिसांनी त्यांना शोधून काढलं आहे.

Harshvardhan Patil On Ajit Pawar
Harshvardhan Patil : “मी पहाटे उठून कुठे जात नाही”, हर्षवर्धन पाटील यांची अजित पवारांवर खोचक टीका
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Amit Thackeray on Eknath Shinde
Amit Thackeray : “धनुष्यबाण आणि पक्षनाव घेऊन एकनाथ शिंदेंनी चूक केली”, शिवसेनेतील बंडखोरीवरील अमित ठाकरेंची प्रतिक्रिया चर्चेत!
Devendra Fadnavis News
Devendra Fadnavis : महाराष्ट्र विधानसभेत महायुतीला किती जागा मिळणार? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही..”
MNS Chief Raj Thackeray
Raj Thackeray : राज ठाकरेंनी लढवलेली आणि जिंकलेली एकमेव निवडणूक कुठली? त्यांनीच दिलं उत्तर म्हणाले..
NCP Sharad Pawar Third Candidate List
NCP Sharad Pawar Third Candidate List : मोठी बातमी! शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंच्या विरोधात दिला ‘हा’ तगडा उमेदवार
Sujay Vikhe Patil Emotional Speeh
Sujay Vikhe Patil : भरसभेत सुजय विखेंना अश्रू अनावर; म्हणाले, “सातत्याने मला संपवण्याचा प्रयत्न होतोय!”

हे ही वाचा >> NCP Candidate 3rd List : मोठी बातमी! अजित पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर; कोणाला कोणत्या मतदारसंघातून मिळाली उमेदवारी?

दरम्यान, देशमुखांना अटक व्हावी यासाठी ठिय्या आंदोलन करणाऱ्या जयश्री थोरात व त्यांच्यासह इतर ५० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयश्री थोरात पोलिसांना म्हणाल्या, तुम्हाला कोणाला अटक अटक करायचं असेल तर मला करा, पण बाकीच्या सर्वसामान्य लोकांना त्रास द्यायचा नाही.

हे ही वाचा >> Raj Thackeray : राज ठाकरेंनी लढवलेली आणि जिंकलेली एकमेव निवडणूक कुठली? त्यांनीच दिलं उत्तर म्हणाले..

जयश्री थोरात सुजय विखेंविरोधात आक्रमक

जयश्री थोरात म्हणाल्या, वसंत देशमुख हे सुजय विखे पाटील यांच्या सभेच्या अध्यक्षस्थानी होते. मुळात आपण आपल्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान कुणाला देतो? एखाद्या सन्माननीय व्यक्तीला आपण आपल्या कार्यक्रमाच्या, सभेच्या अध्यक्षस्थानी सन्मान देतो. मात्र विखे यांनी कोणाला अध्यक्ष बनवले हे आपण पाहिलंच आहे. तसेच सुजय विखे यांनी वसंत देशमुख यांना ते वक्तव्य करत असताना थांबवलं नाही. उलट ते देशमुखांना म्हणाले, तुम्हाला भाषण करायला यावेळी कमी वेळ मिळाला. पुढच्या वेळी जास्त वेळ देऊ. याचा अर्थ सुजय विखे वसंत देशमुख यांना प्रोत्साहन देत होते.

Story img Loader