राज्यात सत्ताधारी तीन पक्ष आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोप होत असल्याचं चित्र राज्यात आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारमधल्या तिन्ही पक्षांमध्ये विसंवाद असल्याची टीका केली जात असतानाच भाजपाकडून एक मोठं विधान करण्यात आलं आहे. भाजपा आमदार आशिष शेलार आज पुण्याच्या मावळ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये भाजपाच्या पदाधिकारी-कार्यकर्ता मेळाव्यामध्ये बोलत असताना त्यांनी हे विधान केल्यामुळे पुन्हा एकदा राज्यात निवडणुकांची चर्चा सुरू झाी आहे. आशिष शेलार यांच्या या विधानामुळे राज्याच तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मावळमधला आमदार भाजपाचाच”

यावेळी बोलताना आशिष शेलार यांनी राज्यातील तिन्ही सत्ताधारी पक्षांवर टीका केली आहे. “ज्या पद्धतीने तीन पक्षांत आपापसात विसंवादाची रोज लढाई लागली आहे आणि त्या तीन पक्षातल्या दोन पक्षांचे जे संकेत आमच्याकडे येत आहेत, या सगळ्याचा अभ्यास केला तर अनुमान असं काढता येऊ शकतं की राज्यात केव्हाही निवडणूक लागू शकेल”, असं ते म्हणाले. “अशा परिस्थितीत जेव्हा निवडणूक लागेल, तेव्हा मावळमधला आमदार भाजपाचाच असला पाहिजे”, असं जाहीर आवाहन त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना केलं आहे.

“जो मैं बोलता हूँ, वो करता हूँ”

दरम्यान, यावेळी बोलताना आशिष शेलार यांनी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनाच अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे. “जो मैं बोलता हूं वही करता हूं, और जो मैं नहीं बोलता, वो डेफिनेटली करता हूं. त्यामुळे माझ्या नादाला लागू नका, पालकमंत्र्यांनी आणि आमदारांनी हे लक्षात ठेवावं”, असं आशिष शेलार यावेळी म्हणाले. “काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं वर्णन घोटाळेबाज, झोलबाज आणि दगाबाज असं होईल”, असं देखील आशिष शेलार म्हणाले.

“शेतकऱ्यांवर गोळ्या झाडणाऱ्याला प्राईम पोस्टिंग”

मावळमध्ये शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबार प्रकरणी देखील आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. “मावळ शेतकरी गोळीबारात तीन शेतकरी मारले गेले. १८५ शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले. त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याचं काम फडणवीस सरकार केलं आहे. ज्याने गोळ्या झाडल्या त्याला आज मुंबईमध्ये प्राईम पोस्टिंग दिली आहे. मावळ मधील शेतकऱ्यांचे खरे शत्रू कोण हे आज पुन्हा एकदा सांगायचं आहे”, अशा शब्दांत आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

“अजित पवार विधानसभेत म्हणाले होते…”

दरम्यान, पुण्यातील स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केल्याच्या घटनेवरून देखील आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. “पुण्यातला एमपीएससीचा विद्यार्थी स्वप्नील लोणकर यानं आत्महत्या केली. त्याला स्वत:चं भविष्य अंधकारमय दिसलं. त्याच्या आत्महत्येनंतर ६ जुलैला विधानसभेत उपमुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं की ३१ जुलैपर्यंत सर्व रिक्त जागा भरू. पण त्यांनी जागा भरण्याच्या प्रस्तावाचा जीआरच ३१ जुलैला काढला. ३० सप्टेंबरपर्यंत ते आश्वासन पूर्ण करू असं म्हणाले होते”, असं आशिष शेलार यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mla ashish shelar predicts assembly elections in maharashtra pmw
First published on: 01-10-2021 at 17:52 IST