scorecardresearch

Premium

“न ‘होणाऱ्या’ बाळासाठी खोटी सजावट, पण…”, भाजपाचा ठाकरे गटाला टोला

३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबरला मुंबईत ‘इंडिया’ आघाडीची बैठक पार पडणार आहे.

india
इंडिया आघाडीच्या बैठकीवरून आशिष शेलार यांनी ठाकरे गटाला टोला लगावला आहे.

देशातील लोकसभा निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी विरोधकांनी एकत्र येत ‘इंडिया’ आघाडीची स्थापना केली आहे. बिहार, कर्नाटकनंतर महाराष्ट्रात ‘इंडिया’ आघाडीची तिसरी बैठक पार पडत आहे. महाविकास आघाडीने या बैठकीचं आयोजन केलं आहे. तर, शिवसेनेकडून ( ठाकरे गट ) बैठकीसाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे. ठिकठिकाणी बॅनरबाजीही करण्यात आली आहे. यावरून भाजपा आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे गटाला लक्ष्य केलं आहे.

“काय ती होर्डिंग लावत आहेत… केवढे ते फोटो… कोण कुणाकडे पाहतोय आणि कोण कुणाला हसतोय काही कळत नाही. भाजपाबरोबर होते तेव्हा भलेमोठे फोटो होर्डिंगवर झळकत होते. आता सोळा केले गोळा आणि स्वतःच स्वतःचा करून घेतला पालापाचोळा!”, असा टोला आशिष शेलार यांनी ठाकरे गटाला लगावला आहे.

Army-Recruitment
सैन्यदलात भरती, करा विनामूल्य अर्ज
prices petrol diesel
Petrol-Diesel Price on 8 October: मुंबईकरांना दिलासा मात्र, ‘या’ शहरांमध्ये वाढले पेट्रोलचे दर
Petrol Diesel Price
Petrol-Diesel Price on 30 September: मुंबईसह राज्यभरात आज काय आहेत पेट्रोलचे दर? जाणून घ्या 
maharashtra assembly speaker rahul narvekar in delhi
विधानसभा अध्यक्ष नार्वेकर ३० सप्टेंबरपासून घाना दौऱ्यावर; ठाकरे गटाचा आक्षेप

हेही वाचा : “त्यांना कसं संपवायचं, हे…”, नितीन गडकरींविरुद्धच्या कथित कटाबद्दल संजय राऊतांचं विधान

ट्वीट करत आशिष शेलार म्हणाले, “मराठीत गाजलेल्या ‘अशी ही बनवाबनवी’ सिनेमातील ते दृश्य… स्त्री वेशातील लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे पार्वतीच्या डोहाळे जेवणाची लगबग सुरु… ‘न होणाऱ्या’ बाळासाठी खोटी खोटी सजावट… सत्य सगळ्यांना माहिती असतानाही केवळ आपले ‘घर’ टिकवता यावे म्हणून धडपड… नटूनथटून बाकी मित्र नाचत आहेत…’कोणी तरी येणार येणार गं… पाहुणा घरी येणारं गं..’ हे गाणं गात आहेत.”

“उबाठा गटाकडून मुंबईत तथाकथित ‘इंडिया’नावाच्या आघाडीच्या स्वागताची जी लगबग सुरु आहे ती पाहताना… वरील दृश्य पटकन आठवते. काय ती होर्डिंग लावत आहेत… केवढे ते फोटो… कोण कुणाकडे पाहतोय आणि कोण कुणाला हसतोय काही कळत नाही… भाजपाबरोबर होते, तेव्हा भलेमोठे फोटो होर्डिंगवर झळकत होते. आता सोळा केले गोळा आणि स्वतःच स्वतःचा करून घेतला पालापाचोळा”, अशी टोलेबाजी आशिष शेलार यांनी ठाकरे गटावर केली आहे.

हेही वाचा : चंद्रकांत पाटलांकडून अजित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार? उदय सामंतांची प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबईत कसं असणार नियोजन?

३१ ऑगस्टला सायंकाळी ६ वाजता ‘इंडिया’ आघाडीसाठी आलेल्या नेत्याचं स्वागत केलं जाईल. सायंकाळी ६.२० ते ८२० या वेळेत अनौपचारिक बैठक पार पडेल. त्यानंतर ८.३० ला इंडिया आघाडीची डिनर डिप्लोमसी असेल. उद्धव ठाकरेंकडून ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांसाठी डिनरचं आयोजन करण्यात आलं आहे. १ सप्टेंबरला सकाळी १०.३० ते दुपारी २ दरम्यान ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडेल. जेवणानंतर ३.३० वाजता पत्रकार परिषद होणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp mla ashish shelar taunt thackeray group over opposition india meeting mumbai ssa

First published on: 29-08-2023 at 15:53 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×