scorecardresearch

Premium

“एकदा लोकसभेची निवडणूक होऊद्या, तुमच्या प्रत्येक…”, भाजपा आमदाराचा श्रीकांत शिंदेंना इशारा

“शिवसेनेच्या लोकांनी बाग, मैदानांच्या जागेवर अनधिकृत बांधकामे केली”, असा आरोपही भाजपा आमदारांनी केला.

bjp shrikant shinde
भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी श्रीकांत शिंदे यांना लक्ष्य केलं आहे. ( फोटो सौजन्य – फेसबुक, इंडियन एक्स्प्रेस )

गेल्या काही दिवसांपासून कल्याणमध्ये भाजपा आणि शिवसेना ( शिंदे गट ) यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे हे राज्यातील भाजपा कार्यकर्त्यांचं खच्चीकरण करण्याचं काम करत आहेत, असा आरोप कल्याण पूर्वचे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी केला होता. आता पुन्हा आमदार गणपत गायकवाड यांनी श्रीकांत शिंदे यांना लक्ष्य केलं आहे.

“एकदा लोकसभेची निवडणूक होऊद्या. तुमच्या प्रत्येक आरोपांचं उत्तर देणार,” असा इशारा गणपत गायकवाड यांनी अप्रत्यक्षपणे श्रीकांत शिंदे यांना दिला आहे. कल्याण जिल्हा भाजपातर्फे पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीची पत्रे वाटप आणि कार्यकारिणी निवडीचा कार्यक्रम रविवारी ( १७ सप्टेंबर ) पार पडला. यावेळी गपणत गायकवाड बोलत होते. तेव्हा मंत्री रवींद्र चव्हाणही उपस्थित होते.

Gutami sai mrunmayi
गौतमी देशपांडे ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याला करतेय डेट? सई ताम्हणकरच्या कमेंटवर उत्तर देत मृण्मयी म्हणाली…
gang rape
संतापजनक: मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर गँगरेप; काही तासांतच जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
Ajit Pawar on Sharad Pawar Praful Patel Photo
पक्षातील बंडखोरीनंतरही शरद पवार आणि प्रफुल्ल पटेलांचा एकत्र फोटो, चर्चांना उधाण, अजित पवार म्हणाले…

हेही वाचा : संभाजीनगरमधील वाघाच्या बछड्याचं नामकरण, अजित पवारांनी ‘आदित्य’ नावाची चिठ्ठी उचलताच मुनगंटीवारांनी…

“…तर जशास तसे उत्तर देणार”

गणपत गायकवाड म्हणाले, “त्यांच्याकडे धनुष्यबाण असले तरी माझ्याकडेही आता रॉकेट आहेत. तेही आता चांगले काम करुन बाणाला उत्तर देऊ शकतात. मला छेडण्याचा प्रयत्न केला तर मी जशास तसे उत्तर देईन.”

“कल्याण पूर्वमधील कामे दुसऱ्यांच्या नावाने”

“कल्याण पूर्वच्या जनतेचे हाल करणाऱ्यांचं आता नाव घेत नाही. मात्र, पुन्हा छेडण्याचा प्रयत्न केला, तर तेव्हा नाव घेऊन सांगेन. मी कोणाच्या बापाला बाप म्हणत नाही. पण, माझा निधी कोणाच्या कोणाच्या टेबलवर अडवून ठेवला होता, हेही जनतेला सांगणार आहे. कल्याण पूर्वमध्ये १२९ कोटींची कामे मी मंजूर करून आणली होती. परंतू, दुसऱ्यांचं नाव लावून ही कामे चालू आहेत,” असा आरोप गणपत गायकवाड यांनी केला.

“शिवसेनेच्या नेत्यांनी आरक्षित जागा मोकळ्या कराव्यात”

“शिवसेनेच्या लोकांनी बाग, मैदानांच्या जागेवर अनधिकृत बांधकामे केली. तीच शिवसेना सांगते, ‘आमदार गणपत गायकवाड काय काम करतात?’ तुमची अनधिकृत बांधकामे हटवून आरक्षित जागा मोकळ्या करा,” असं आव्हान गणपत गायकवाड यांनी शिवसेनेच्या नेत्यांना दिलं.

हेही वाचा : “घोडा मैदान समोर आहे, कोण…”, बच्चू कडूंचा रवी राणांना सूचक इशारा

“माझ्यावर जेवढे आरोप करायचे आहेत, तेवढे करा”

“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला निधी आणत मंजूऱ्या मी घेतल्या. पण, तिथेही श्रेय घेण्यासाठी काहीजण पुढे आले. आपल्याला निवडणुकीत परत त्यांच्याबरोबर फिरायचं असल्याने काही गोष्टी बोलत नाही. एकदा लोकसभेची निवडणूक होऊद्या. माझ्यावर जेवढे आरोप करायचे आहेत, तेवढे करा. तुमच्या प्रत्येक आरोपाचं उत्तर देण्याची ताकद माझ्यात आहे. तुम्ही मला उत्तर देऊ शकणार नाही, एवढे पुरावे माझ्याकडे आहेत,” असेही गणपत गायकवाड यांनी म्हटलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-09-2023 at 22:34 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×