“कोकण सब हिसाब करेगा… याद रखना शिवसेना!”

भाजपा नेते नितेश राणेंचा इशारा ; मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्याबद्दल केली आहे टिप्पणी

संग्रहीत छायाचित्र

तौते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी कोकणात दाखल झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंचनामे पूर्ण होताच मदतीसंदर्भात निर्णय घेणार असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी आपण फोटोसेशन करण्यासाठी आलेलो नाही सांगत विरोधकांना टोला देखील लगावला. तर, आता भाजपा नेत्यांकडून देखील मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्यावर टीका-टिप्पणी सुरू झाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, चित्रा वाघ यांच्यानंतर आता भाजपा नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्यावर टीका करत, शिवसेनेला इशारा दिला आहे.

“यालाच म्हणतात “lipstick” दौरा..मुख्यमंत्री.. कुठल्याही गावाला भेट नाही..मोजून १० किमी आतच..विमानतळावरचा आढावा..दौरा संपला!!! ईथे..फडणवीसांचा ७०० किमीचा झंझावात..कोकण सब हिसाब करेगा… याद रखना शिवसेना!” असं नितेश राणे यांनी ट्विट केलं आहे.

“उद्धव ठाकरे कधी नव्हे ते दीड वर्षानंतर बाहेर पडले, त्यांनी आता इतरांना उपदेश करण्याचं काही कारण नाही”

या अगोदर करोनाचा उद्रेक झालेला असताना सलग दुसऱ्या वर्षी आलेल्या चक्रीवादळाला नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जबाबदार ठरवलं होतं. “उद्धव ठाकरे सरकारची महाराष्ट्रातील दोन वर्ष… २०२० चक्रीवादळ (निसर्ग चक्रीवादळ), २०२१ चक्रीवादळ. २०२० आणि २०२१मध्ये करोनाबळींमध्ये पहिल्या क्रमांकावर. हे पुढे सुरूच आहे. सगळं वाईटच घडत आहे. हे तर ग्रहणांचेही बाप आहेत, बॉस,” अशी टीका नितेश राणे यांनी केली होती.

वैफल्यग्रस्त असल्याच्या उद्धव ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांनी दिलं उत्तर; म्हणाले…

तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका करताना “तुम्ही येता आणि जाता….मागच्या वेळीदेखील येऊन गेलात. नुसत्या बाता मारत असून कोकणाला काही दिलं नाही. गेल्यावेळचे निसर्ग वादळाचे पैसेही यांनी दिलेले नाहीत आणि येथे येऊन राजकीय वक्तव्य करतात याचं आश्चर्य वाटतं”. असं म्हटलं आहे.

“मुख्यमंत्र्यांचा दौरा म्हणजे केवळ ‘दर्शनाचा’ कार्यक्रम”; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचं टीकास्त्र

मुख्यमंत्र्यांचा नुकसानीची पाहणी कऱण्यासाठीचा दौरा केवळ दर्शनाचा कार्यक्रम असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. “विरोधी पक्षनेते तीन दिवस, मुख्यमंत्री तीन तास. विरोधी पक्षनेते कोकणवासीयांच्या बांधावर जाऊन विचारपूस, मुख्यमंत्र्यांचा केवळ दर्शनाचा कार्यक्रम.” असं दरेकर म्हणाले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bjp mla nitesh rane criticizes shiv sena msr

Next Story
नाकर्त्यां लोकप्रतिनिधींमुळे पूरग्रस्त अन्नछत्रात!
ताज्या बातम्या