scorecardresearch

“जनाब संजय राऊतांसारखा खुशामतगिर परत होणे नाही”

“इतिहासातलं तुमचं नाव खुशामतगिर म्हणून नेहमीच अव्वल राहिल”

BJP, Ram Satpute, Shivsena, Sanjay Raut, PM Narendra Modi
"इतिहासातलं तुमचं नाव खुशामतगिर म्हणून नेहमीच अव्वल राहिल"

स्वातंत्र्यानंतर देशात ‘सुई’ बनत नव्हती. त्यानंतर वेगाने प्रगती झाली. देशाने कृषी व उद्योग क्षेत्रात प्रगती केली. नेहरू-इंदिरा काळात डॉलरच्या तुलनेत रुपया स्थिर होता. आज रुपया धारातीर्थी पडला आहे. सर्वकाही कोसळताना, नष्ट होताना दिसत आहे. तेव्हा नवा इतिहास कसा घडविणार? अशी विचारणा शिवसेनेने सामना संपादकीयमधून मोदी सरकारला केली आहे. केली आहे. जुने नष्ट करणे म्हणजे नवे काही घडवणे नव्हे असा टोला शिवसेनेने लगावला आहे. मोदींचे सरकार स्वातंत्र्यानंतरच्या चुका सुधारत आहे. कोणत्या चुका? अशी विचारणाही शिवसेनेने केली आहे.

“पहिल्या पाच वर्षात नेताजी खिजगणतीत नव्हते, नौका पार करण्याचा प्रयत्न दिसतोय,” शिवसेनेचा मोदी सरकारवर निशाणा

“मोदी यांनी दिल्लीतील जुन्या भव्य इमारती पाडण्याचे काम सुरू केले आहे. संसद भवनाची ऐतिहासिक व रोमांचक वास्तूही त्यांच्या कचाटय़ातून सुटली नाही. सध्याच्या संसद भवनाचे महत्त्व स्वातंत्र्य लढय़ाशी संबंधित आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढय़ात सहभागी झालेल्या महान वीरांच्या पदस्पर्शाने ही इमारत पावन झाली. याच इमारतीत संविधान सभा भरली. येथेच तो नियतीशी करार झाला. मोदी प्रथम दिल्लीत पंतप्रधान म्हणून आले तेव्हा याच इमारतीच्या पायरीवर मस्तक टेकवून ते भावनाविवश झाले होते, पण ही इमारत म्हणजे चूक आहे व ती सुधारण्यासाठी मोदी हे नवी इमारत बांधत आहेत. मोदी यांनी आता इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भव्य होलोग्राम पुतळा बसवला आहे. स्वातंत्र्यानंतर देशाची संस्कृती व संस्काराबरोबरच अनेक महान नेत्यांचे योगदान नाकारण्यात आले. त्यात नेताजी आहेत असे भाजपचे मत बनले आहे. त्यामुळे मोदी सरकार चुका सुधारत आहे,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.

दरम्यान शिवसेनेच्या या टीकेला भाजपा आमदार राम सातपुते यांनी उत्तर दिलं आहे. “जनाब संजय राऊत, इतिहासातलं तुमचं नाव खुशामतगिर म्हणून नेहमीच अव्वल राहिल. आपल्यासारखा खुशामतगिर होणे नाही,” अशी टीका राम सातपुते यांनी केली आहे.

“प्राईड व्हॅल्यू काय असते हे समजण्याची तुमची कुवत नाही. त्यामुळेच पंतप्रधान मोदी बांधत असलेल्या सेंट्रल व्हिस्टा हे नव संसद भवन, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा किंवा काशीचं भव्य दिव्य मंदिर असो…याने आपला जळफळाट होणारच आहे,” असा टोला राम सातपुते यांनी लगावला आहे.

“महाराष्ट्रातील समस्यांबद्दलही बोलत चला. वंचित घटकातील विद्यार्थ्यांचा टक्का उच्चशिक्षण व संशोधनात वाढावा यासाठी बार्टीसारख्या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. परंतु या आघाडी सरकारच्या कामचुकार धोरणामुळे तिचा उद्देशच नष्ट होतोय. वंचित समाजातील ५१८ विद्यार्थ्यांच्या मुलाखती होऊन वर्ष उलटून गेलं तरी त्यांना शिष्यवृत्ती मिळालेली नाही. वंचित नेहमी वंचितच राहिले पाहिजे, ही काँग्रेसची भूमिका असून आपलं सरकार त्याला साथ देत वंचित समाजाचं वाट्टोळं करत आहे

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp mla ram satpue on shivsena sanjay raut pm narendra modi sgy