भाजपा खासदार हीना गावित यांच्या वाहनाला अपघात, खासगी रुग्णालयात दाखल

भारतीय जनता पार्टीच्या खासदार हीना गावित यांच्या वाहनाला अपघात झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.

भाजपा खासदार हीना गावित यांच्या वाहनाला अपघात, खासगी रुग्णालयात दाखल

भारतीय जनता पार्टीच्या खासदार हीना गावित यांच्या वाहनाला अपघात झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. या अपघातात गावित यांच्यासह त्यांच्या कारमधील काही कार्यकर्त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. गावित यांची कार दुचाकीला धडकल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या दुर्घटनेत दुचाकीवरील महिला आणि पुरुष जखमी झाले आहेत. या अपघातानंतर गावित यांची कार एका झाडाला जाऊन धडकली.

खासदार गावित यांच्यासह कार्यकर्ते आणि दुचाकीवरील जखमी महिलेला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. रविवारी दुपारी नंदुरबार शहरातील गुरव चौक येथे हा अपघात झाला आहे. याबाबतचं वृत्त टीव्ही९ मराठीने दिलं आहे. खासदार गावित आपल्या काही कार्यकर्त्यांसह कारने एका खासगी पतसंस्थेच्या उद्घाटनासाठी जात होत्या, यावेळी हा अपघात घडला आहे. या अपघातात गावित यांच्यासह तीन कार्यकर्त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“…तर सुप्रिया सुळेंच्या विरोधात जिंकलो असतो” महादेव जानकरांचं मोठं विधान!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी