Premium

“राष्ट्रवादीतील पाच नेत्यांची चौकशी करायची आहे, त्यांची नावे लवकरच…” भाजपाच्या बड्या नेत्याचे मोठे विधान

भाजपाचे नेते रणजितसिंह निंबाळकर यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे.

SHARAD PAWAR
शरद पवार (संग्रहित फोटो)

भारतीय जनता पार्टीचे नेते मोहित कंबोज यांनी सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. असे असताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यात अद्याप पूर्णपणे क्लीन चिट मिळाली नसून २०१९ मध्ये एसीबीने दिलेल्या क्लीन चिटबाबतचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयाने अद्याप स्वीकारला नसल्याचे समोर आले आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते रणजितसिंह निंबाळकर यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादीच्या ५ नेत्यांची चौकशी करावी अशी माझी मागणी आहे. लवकरच त्यांची नावे देशपातळीवर कळवणार आहोत, असे निंबाळकर म्हणाले आहोत. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> सह्याद्री उद्योग समुहाकडून विनोद कांबळीला जॉब ऑफर; मराठमोळ्या उद्योजकाने नोकरी ऑफर करताना पगाराचा आकडाही सांगितला

“राष्ट्रवादीतील दहा नेत्यांपैकी ५ नेत्यांची चौकशी केली जावी. त्यांची नावे आम्ही देशपातळीवर कळवणार आहोत. या पाच लोकांच्या फायली आलेल्या आहेत. यातील काही आमदार, मंत्री होते. यासाठी ईडी, सीबीआयच्या हस्तक्षेपाची गरज आहे. लवकरच आम्ही हे केंद्र सरकारला कळवणार आहोत,” असे विधान रणजितसिंह निंबाळकर यांनी केले आहे.

हेही वाचा >>> राठोडांना शह देण्यासाठीच उद्धव ठाकरेंचा पोहरादेवी दौरा

भाजपाचे नेते मोहित कंबोज यांनी केलेल्या आरोपांवरदेखील निंबाळकर यांनी भाष्य केले आहे. “राष्ट्रवादी पक्षात अनेक चोर आहेत. यातील कोणता चोर नेता मोहित कंबोज यांना सापडला आहे, हे त्यांना विचारल्यावरच समजेल. राष्ट्रवादीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप निश्चितपणे झालेले आहेत. यामध्ये कोणाचेही दुमत नाहीये. चौकशी केली तर योग्य ते समोर येईल,” असे निंबाळकर म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp mp ranjitsinh nimbalkar said will demand inquiry of five ncp leader prd

First published on: 19-08-2022 at 09:30 IST
Next Story
मोठी अपडेट! संजय राऊत वापरत होते बिल्डरच्या लक्झरी कार, ईडी तपासात उघड