bjp mp Unmesh Patil attack shivsena leader aaditya thackeray ssa 97 | Loksatta

“आदित्य ठाकरेंनी अंतर्मनाला…”, भाजपा खासदाराचा हल्लाबोल; म्हणाले, “वेदान्ता प्रकल्प गुजरातला गेल्याची सीबीआय…”

Unmesh Patil On Aaditya Thackeray : वेदान्ता प्रकल्प राज्यातून गेल्याने आरोप प्रत्यारोप होत आहेत. यावर भाजपा खासदार उन्मेश पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“आदित्य ठाकरेंनी अंतर्मनाला…”, भाजपा खासदाराचा हल्लाबोल; म्हणाले, “वेदान्ता प्रकल्प गुजरातला गेल्याची सीबीआय…”
उन्मेश पाटील आदित्य ठाकरे ( संग्रहित छायाचित्र )

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापासूनच सत्ताधारी आणि शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्यामध्ये जोरदार कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. मग ती ‘खोके सरकार’ म्हणून केलेली टीका असो किंवा सत्ताधाऱ्यांनी ‘आदित्य ठाकरेंची ‘दिशा’ चुकली’ असं म्हणत लगावलेला खोचक टोला असो. अलिकडे वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्प राज्यातून गुजरातला गेल्यावरून राजकारण पेटलं आहे. या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंनी सातत्याने सत्ताधाऱ्यांवर आणि विशेषत: एकनाथ शिंदे गटावर टीकास्र सोडलं आहे.

शनिवारी ( २४ सप्टेंबर ) आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याप्रकरणी पुण्याच्या वडगावमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी वेदांता, बल्क ड्रग पार्कनंतर मेडिसिन डिव्हाईस पार्क प्रकल्प महाराष्ट्रातून गेल्याचं सांगितलं. आदित्य ठाकरेंच्या या आरोपांना आता भाजपा खासदार उन्मेश पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“एमआयडीसीला रिअल इस्टेट कंपनी कोणी केली”

“आदित्य ठाकरेंनी अंतर्मनाला विचारलं पाहिजे की, महाविकास आघाडी सरकार असताना पाच दिवसांच्या वर तुम्ही अधिवेशन घेतलं का? गुजरातने तीन वर्षापूर्वी आणलेली सेमीकंडक्टर पॉलिसी महाराष्ट्राने का आणली नाही. एमआयडीसीला युवकांचे रोजगार केंद्र समजलं जाते. त्याला रिअल इस्टेट कंपनी कोणी केली?,” असा सवाल पाटील यांनी आदित्य ठाकरेंना विचारला आहे.

“दूध का दूध पाणी का पाणी होऊद्या”

“एमआयीडीतील भूषण देसाई, गिरीष पवार यांनी केलेल्यी व्यवहारांची चौकशी करा. एमआयीडीसीमध्ये तीन हजार कोटी रूपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. वेदान्ता प्रकल्प गुजरातला गेल्याची सीबीआय चौकशी करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विनंती करतो. दूध का दूध पाणी का पाणी होऊद्या,” असेही उन्मेश पाटील यांनी म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
‘आधी म्हटले मी सरकारमध्ये सामील होणार नाही, आता..’, देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रवादीचा टोला!

संबंधित बातम्या

हैद्राबादच्या निजामाच्या महाबळेश्वर येथील २५० कोटींच्या संपत्तीवर सातारा जिल्हाधिकाऱ्यांची धडक कारवाई
गोपीनाथ मुंडेंविषयी सुषमा अंधारेंचे मोठे विधान, नितीन गडकरींचे नाव घेत म्हणाल्या…
संजय राऊतांचे मोठे विधान, म्हणाले “…तर सरकारला अमित शाहादेखील वाचवू शकणार नाहीत”
VIDEO: सुषमा अंधारेंच्या ‘उठ दुपारी आणि घे सुपारी’ टीकेला राजू पाटलांचं प्रत्युत्तर, म्हणाले ‘कर भाषण आणि…’
“आमच्याकडे एक ‘सुशी ताई’ आहेत ज्यांच्या…”, मनसे आमदार राजू पाटलांची सुषमा अंधारेंवर बोचरी टीका

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Viral Video: हायवेवर चक्क ड्राइव्हरशिवाय १ किलोमीटर धावला कंटेनर अन्…
“…तेव्हा मी १८ तास जेवण केलं नव्हतं” ‘काश्मीर फाइल्स’ चित्रपटातील ‘तो’ प्रसंग सांगताना अनुपम खेर भावूक
शिवाजी महाराजांविषयी बोलताना भाजपाचे प्रसाद लाड यांचे अजब विधान, म्हणाले “शिवरायांचा जन्म…”
Video: भयंकर! चालत्या बसमध्ये चालकाला आला हार्ट अटॅक; नियंत्रण सुटल्याने बस प्रत्येकाला उडवत सुटली अन…
‘या’ सवयींमुळे वाढू शकतो मधुमेह होण्याचा धोका; वेळीच व्हा सावध