देशात करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाउन करण्यात आलं आहे. जीवनावश्यक वस्तू घेण्याशिवाय बाहेर पडण्यास सर्वांना मनाई करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत घरात बसून सर्व जण आपले छंद जोपासत आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीदेखील आपला हार्मोनिअमचा छंद जोपासला आहे. घरात बसून हार्मोनिअमच्या मदतीनं वेळेचा सदुपयोग केल्याचा व्हिडीओ त्यांनी शेअर केला होता. यावरून आता भाजपा नेते निलेश राणे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. "मला डाऊट होताच यांना मी प्लॅटफॉर्मवर पेटी वाजवताना पाहिलं होतं," अशा शब्दात त्यांनी राऊत यांच्यावर टीका केली आहे. यापूर्वीही अनेकदा निलेश राणे यांनी राऊत यांच्यावर टीकेचे बाण सोडले होते. आता पुन्हा एकदा त्यांनी राणे यांनी राऊत यांच्यावर टीका केली आहे. "आईशपथ मला डाऊट होता संज्याला मी चर्चगेट स्टेशन प्लॅटफॉर्मवर पेटी वाजवताना फाटक्या कपड्यात बघितलं होतं. आज खात्री झाली," अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं आहे. आईशपथ मला डाऊट होता संज्याला मी चर्चगेट स्टेशन प्लॅटफॉर्म वर पेटी वाजवताना फाटक्या कपड्यात बघितलं होतं. आज खात्री झाली. pic.twitter.com/MTNkZ3uKnh — Nilesh N Rane (@meNeeleshNRane) March 25, 2020 १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करोना व्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा म्हणजे १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन जाहीर केला आहे. यादरम्यान नागरिकांना अत्यावश्यक सेवा पुरवण्यात येणार आहेत. आपल्याला करोना व्हायरसची साखळी तोडायची आहे. देशव्यापी लॉकडाउननं तुमच्या घरावर एक लक्ष्मण रेषा आखली आहे. तुम्हाला तुमचं घराबाहेरील एक पाऊल करोना तुमच्या घरात आणू शकतं, असं मोदी म्हणाले होते.