उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळलं असून भाजपाने सत्तास्थापनेचा दावा करण्याची तयारी सुरु केली आहे. उद्धव ठाकरेंनी राजीनामा देताच मुंबईत भाजपाच्या कार्यालयाबाहेर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जल्लोष करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना आणि भाजपा नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. त्यातच संजय राऊत यांनी केलेल्या एका ट्विटला भाजपा नेते नितेश राणे यांनी मीम शेअर करत उत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पृथ्वीराज चव्हाणांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्व कौशल्यावर उपस्थित केला प्रश्न; म्हणाले “त्यांच्यात लढण्याची इच्छा नाही”

“चाकरी करत आहात याचा पश्चाताप होईल,” उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर राऊतांचं एकनाथ शिंदे गटाला आव्हान; म्हणाले “तुमचा नेता…”

एकनाथ शिंदेंसह पक्षातील आमदारांनी बंड पुकारल्यामुळे उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला. यामुळे संजय राऊत यां नी ट्विटरला एक फोटो शेअर केला होता. या फोटोतून त्यांनी उद्धव ठाकरेंच्या पाठीवर वार केल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला होता. ‘नेमके हेच घडले’ असं कॅप्शन देत त्यांनी फोटो शेअर केला होता.

नितेश राणेंचं उत्तर –

संजय राऊतांच्या या ट्विटवर नितेश राणे यांनी मीम शेअर करत उत्तर दिलं. यामध्ये २०१९ मध्ये शिवसेनेने देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीवर वार केला आणि २०२२ मध्ये शिदेंनी उद्धव ठाकरेंच्या असं दाखवण्यात आला आहे. यावेळी दोघांच्याही पाठीवर धनुष्यबाण दाखवण्यात आला. सोबतच हे कर्माचं फळ आहे असंही लिहिण्यात आलं आहे. नितेश राणे यांनी हे मीम शेअर करताना ‘रिटर्न गिफ्ट’ असा टोलाही लगावला आहे.

२०१९ मध्ये शिवसेनेने मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्षांसाठी वाटून घेण्याचा शब्द न पाळल्याचा आरोप करत भाजपासोबतची युती तोडली होती. यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीने राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं आणि उद्धव ठाकरेंकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा देण्यात आली.

VIDEO: राजीनामा देत असताना राज्यपालांसमोरच शिवसैनिकांची घोषणाबाजी; त्यानंतर उद्धव ठाकरेंनी केलं असं काही…

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे ठाकरे सरकारने बहुमत गमावल्याच्या भाजपाच्या पत्रानुसार राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांना दिले होते. या बहुमत चाचणीस शिवसेनेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. रात्री नऊच्या सुमारास सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेची याचिका फेटाळल्यानंतर थोडय़ाच वेळात ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली आणि राजीनामा सादर करण्यासाठी राजभवन गाठलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp nitesh rane answer on shivsena sanjay raut tweet uddhav thackeray resignation eknath shinde sgy
First published on: 30-06-2022 at 12:38 IST