शिवसेनेत असल्यानंतर प्रत्येकजण वाघ होत नाही. आजूबाजूला मांजरी पण असतात अशा शब्दांत भाजपा आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्वीकृत संचालकपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर नितेश राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना तसंच संजय राऊतांवर टीका केली.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर नितेश राणेंची निवड होताच शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “समर्थकांचा अड्डा…”

eknath shinde devendra fadnavis
सर्व पक्षांना संपवून भाजपाला एकट्यालाच जिवंत राहायचंय? शिंदे गटाचा संतप्त सवाल; नेमकं प्रकरण काय?
mahendra thorve dada bhuse news
विधानभवनात शिंदे गटाचे आमदार थेट मंत्र्यांनाच भिडले; कारण विचारताच म्हणाले, “…म्हणून माझी दादा भुसेंशी बाचाबाची झाली!”
singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…
sushma andhare
कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांंच्या समोर लढणे आम्हाला मोठे आव्हान वाटतच नाही; उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचे मत

संजय राऊतांचा पत्रकार परिषदेत घाम पुसतानाचा व्हिडीओ ट्वीट केल्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “घाबरलेला माणूस कसा दिसतो आणि कितीही आव दाखवत असले तरी घाम पुसत असताना चेहऱ्याचे हावभाव महाराष्ट्राला दिसले पाहिजेत. शिवसेनेत असल्यानंतर प्रत्येकजण वाघ होत नाही. आजूबाजूला मांजरी पण असतात. जनतेला मांजर दिसावी म्हणून तो व्हिडीओ टाकला”.

कायदेशीर प्रक्रियेनुसार आमची निवड – नितेश राणे

“जिल्हा बँकेत तज्ज्ञ संचालक म्हणून माझी आणि माझे सहकारी प्रकाश मोरे यांची निवड जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने केली आहे. कायद्यानुसार जो त्या चौकटीत बसतो त्याचं व्यक्तीला ती जबाबदारी देऊ शकतात. आम्ही आणि आमचे सहकारी त्या चौकटीत बसत असल्यानेच आमच्या खांद्यावर पक्षाने ही जबाबदारी दिली आहे,” अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली आहे.

“बंगल्याच्या नोटीशीला कायदेशीर उत्तर देणार”

मुंबईतील बंगल्याला देण्यात आलेल्या नोटीशीवर बोलताना ते म्हणाले की, “नोटीस पाठवली आहे तर कायदेशीर गोष्टीला कायदेशीर पद्धतीने उत्तर देणार. प्रसारमाध्यमांसमोर उत्तर देणं चौकटीत बसत नाही”.

“शेंबड्या मुलासारखं आमच्याशी लढतात”

“जे या सरकारविरोधात बोलत आहेत त्यांच्याविरोधात मैदानात लढायला घाबरत आहेत. मैदानात हारायचं आणि शेंबड्या मुलासारखं आमच्याशी लढायचं याला काही अर्थ नाही. आम्ही त्यांना अंगावर येण्यापासून थांबवत नाही, पण आम्ही कायदेशीर पद्धतीने उत्तर देऊ,” असा इशारा यावेळी त्यांनी दिला.