शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी जिल्हा न्यायालयाने आमदार नितेश राणे यांना ३० हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. त्याची पूर्तता करण्यासाठी आमदार नितेश राणे हे सावंतवाडी जिल्हा कारागृहात दाखल झाले होते. दरम्यान जामीन मिळाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी इशारा दिला आहे.

मला कोणी अटक करू शकले नाही. माझ्या सिंधुदुर्गातील जनतेला त्रास नको म्हणून मी कुटुंबीय आणि वकिलांशी चर्चा करून स्वतः सरेंडर झालो अशी प्रतिक्रिया आमदार तथा भाजपा नेते नितेश राणे यांनी दिली आहे. दरम्यान थोडे दिवस आता आराम करणार आहे. त्यानंतर मुंबईत पक्षाने दिलेली जबाबदारी सांभाळणार आहे. मात्र ज्या दिवशी बोलेन त्या दिवशी अनेकांना बीपीचा त्रास होईल हे मात्र निश्चित असा इशाराही त्यांनी दिली आहे. विरोधकांकडून सुरु असलेले राजकारण अत्यंत खालच्या पद्धतीचे असल्याचे त्यांनी यावेळी ते म्हणाले.

What Supriya Sule Said?
“जो तुम्हाला धमक्या देतो आहे, त्याला..”, सुप्रिया सुळे भाषणात नेमकं काय म्हणाल्या?
Rahul gandhi
“सत्तेत आल्यावर पहिल्याच दिवशी…”, राहुल गांधींची भंडाऱ्यात अग्निवीर योजना आणि जीएसटीबाबत मोठी घोषणा
reaction of krupal tumane, MP, eknath shinde, ramtek lok sabha constituency, lok sabha election 2024
उमेदवारी नाकारल्यानंतर शिंदे गटाच्या खासदाराची पहिली प्रतिक्रिया,म्हणाले “हो मी दुःखी, पण….”
How much tax will be paid on the gift of 240 crores given by Narayan Murthy to his grandson
Money Mantra: नारायण मूर्तींनी नातवाला दिलेल्या २४० कोटींच्या भेटीवर किती टॅक्स बसणार?

Nitesh Rane Bail: संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणेंना सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

कोल्हापुर रुग्णालयातून डिस्चार्ज घेतल्यानंतर नितेश राणे सावंतवाडी येथील उप-जिल्हा कारागृहात आले होते. यावेळी त्यांना जामिनाची पूर्तता केली. “मी जबाबदार लोकप्रतिनिधी आहे. पोलीस तपास कामात अडथळा येण्यासारखे काही केले नाही. मी जबाबदारीने वागत होतो, परंतु नाहक राजकीय त्रास देण्याचा प्रयत्न झाला. ज्या दिवशी स्वतः पोलिसांकडे हजर झालो तेव्हा न्यायालयाने दिलेल्या सुरक्षेतील चार दिवस बाकी होते. परंतु त्या ठिकाणी माझी गाडी जाणीवपूर्वक अडवण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील माझ्या लोकांना त्रास नको म्हणून मी माझ्या कुटुंबीय व वकिलांशी चर्चा करून मी सरेंडर झालो. मला ते कोणी अटक करू शकले नाही,” असे ते म्हणाले.

नितेश राणेंना कोल्हापूरला हलवलं; छातीत दुखू लागल्याने रुग्णवाहिकेतून रवाना

“आता या ठिकाणी आल्यानंतर दोन चार दिवस आराम करणार आहे. माझ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन दोन दिवस राहणार आहे. त्याठिकाणी काही तपासण्या केल्यानंतर उर्वरित तपासण्या मुंबईत जाऊन करणार आहे,” अशी माहित नितेश राणे यांनी दिली.

“माझ्या तपासण्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात आल्या. मशीनद्वारे तपासणी झाली. माझा ब्लड प्रेशर, शुगर अशा गोष्टी वाढल्या हे सत्य होते. परंतु त्या ठिकाणी नाहक टीका करण्यात आली. अशा गोष्टीत राजकारण करणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला धरून योग्य नाही,” असं नितेश राणे म्हणाले.

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली मुख्यमंत्री अधिवेशन काळात आजारी का पडतात असा प्रश्न केला तर चालेल का? अशी विचारणा त्यांनी टीका करणाऱ्यांना केली.