पंकजा मुंडे दिल्लीत दाखल; समर्थकांची नाराजी पक्षश्रेष्ठींच्या कानावर घालणार?

समर्थकांकडून राजीनामे दिले जात असताना पंकजा मुंडे दिल्लीत दाखल; भाजपाध्यक्षांची घेणार भेट

BJP Pankaja Munde, BJP Pankaja Munde on Cabinet Reshuffle
समर्थकांकडून राजीनामे दिले जात असताना पंकजा मुंडे दिल्लीत दाखल; भाजपाध्यक्षांची घेणार भेट

प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असल्याच्या चर्चांना पंकजा मुंडे यांनी पूर्णविराम दिला असला तरी समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतली. पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत आपण नाही तर समर्थक नाराज असल्याची भूमिका मांडली होती. यावेळी त्यांनी प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा होणंही योग्य असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान राज्यात समर्थकांचं राजीनामासत्र सुरु असतानाच पंकजा मुंडे दिल्लीत दाखल झाल्या आहेत. यावेळी त्या भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेणार आहेत.

केंद्रीय मंत्रिमंडळात प्रीतम मुंडेंना स्थान न दिल्याने बीड जिल्ह्यात भाजपा पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

दिल्लीत भाजपाच्या राष्ट्रीय सचिवांची एक बैठक पार पडणार आहेत. या बैठकीत पंकजा मुंडे सहभागी होणार आहेत. यावेळी पंकजा मुंडे भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेणार आहेत. दरम्यान यावेळी पंकजा मुंडे समर्थकांची नाराजी पक्षश्रेष्ठींसमोर मांडणार का? हे पहावं लागणार आहे.

समर्थकांचे राजीनामे

भाजपाच्या बीड जिल्ह्यातील ११ तालुकाध्यक्षांसह २० पदाधिकाऱ्यांनी शनिवारी राजीनामे दिले. बीड जिल्ह्यातील राजीनाम्याचं लोण अहमदनगर जिल्ह्यामध्येही पोहोचलं असून, पाथर्डी पंचायत समितीच्या सभापती आणि जिल्हा उपाध्यक्ष यांनी राजीनामे देत नाराजी व्यक्त केली आहे.

नाराज नाही, पक्षाचा निर्णय मान्य-पंकजा मुंडे

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच झाला. या विस्तारापूर्वी पंकजा मुंडे यांच्या भगिनी आणि बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केला जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, डॉ. भागवत कराड यांचा समावेश करण्यात आला. कराड यांचा समावेश करून मुंडे भगिनींना शह देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची राज्याच्या राजकारणात सुरू आहे. दुसरीकडे पंकजा मुंडे नाराज असल्याचं बोललं जात होतं, पण मुंडे यांनी आपण नाराज नसल्याचं स्पष्ट केलं. असं असलं तरी कार्यकर्त्यांची नाराजी मात्र लपून राहिली नाही.

भाजपाला टीम नरेंद्र, टीम देवेंद्र मान्य नाही; पंकजा मुंडेंचं मोठं विधान

शनिवारी (१० जुलै) बीड जिल्ह्यातील भाजपाच्या अनेक मुंडे समर्थक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. बीड जिल्ह्याबरोबरच अहमदनगरमध्येही दोघांनी राजीनामे दिल्याची माहिती समोर आली आहे. मुंडे भगिनींच्या समर्थक असलेल्या पाथर्डी पंचायत समितीच्या भाजपाच्या सभापती सुनीता दौंड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ दौंड यांनीसुद्धा आपल्या राजीनामा दिला आहे. या दोघांनीही भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्याकडे राजीनामे सोपवले आहेत.

बीडमधील पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याची संख्या २५ वर

बीड जिल्हा परिषद सदस्या सविता बडे, पंचायत समिती सदस्य प्रकाश खेडकर आणि भाजपा विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष संग्राम बांगर, भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. लक्ष्मण जाधव, भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजय सानप, समाज माध्यमप्रमुख अमोल वडतीले, तालुकाध्यक्ष महादेव खेडकर, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विवेक पाखरे यांच्यासह २५ पदाधिकार्‍यांनी शनिवारी पदाचे राजीनामे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे सोपवले. यामध्ये परळीसह एकूण ११ तालुकाध्यक्षांचा समावेश आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bjp pankaja munde delhi bjp president j p nadda pm narendra modi cabinet reshuffle sgy

ताज्या बातम्या