अहिल्यानगर : छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानशी करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा शहर भाजपने निषेध केला आहे. सपकाळ यांची जीभ छाटणार्यास शहर भाजपच्या वतीने १० लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल, अशी घोषणा शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहयांनी आंदोलनात केली.
शहरातील जुन्या बसस्थानक चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शहर भाजपच्या वतीने हे निषेध आंदोलन करण्यात आले. अनिल मोहिते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहे. सपकाळ यांनी लांगूलचालन करण्याच्या नादात टिपू सुलतान याची बरोबरी थेट शिवाजी महाराजांशी केली आहे.
पुण्यात संघर्ष
सपकाळ यांच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनसमोर रविवारी आंदोलन केले. या वेळी भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. दगड भिरकावण्यात आल्याने काही कार्यकर्ते जखमी झाले. शिवाजीनगर येथील काँग्रेस भवनसमोर रविवारी सकाळी पतित पावन संघटनेकडून आंदोलन करण्यात आले.

