लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. आज सुट्टीचा दिवस नाही. तरीही इतक्या मोठ्या प्रमाणावर कुटुंबाशी संवाद साधायला आलोय. चिपळूणमध्ये प्रचाराची सभा घेतली नाही तरीही विजयी सभेला नक्की येणार असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मी चिपळूण का और मेरा बहुत पुराना रिश्ता है असं कधीही सांगितलं नाही. रिश्ते सांगायचे नसतात उलट निभवायचे असतात, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींवर टीका केली.

संकटाच्या छाताडावर मी चालून जाणारा माणूस आहे

संकट आलं तर त्याच्या छाताडावर चालून जा असं मला आजोबांनी सांगितलं होतं. संकट आलं की जे मुखवटे घातलेले कोण आणि खरे कोण? ते कळतं. सगळं देऊनही ज्यांची लाळ गळत असते ते लाळघोटे आज भाजपासह गेले आहेत असंही उद्धव ठाकरे चिपळूणच्या सभेत म्हणाले.

jitendra awhad ajit pawar l
“नशीब त्यांनी डॉक्टरांना विषाचं इंजेक्शन…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला
Girish Mahajan criticizes Eknath Khadse in jalgaon
“माझ्यामुळे भाजप आहे, म्हणणारे आता थप्पीला” गिरीश महाजन यांच्याकडून एकनाथ खडसे लक्ष्य
Shrikant Shinde, Sanjay Raut, Shrikant Shinde news,
श्रीकांत शिंदे म्हणतात, संजय राऊतांच्या उपचाराचा खर्च आम्ही करू
What Mahesh Manjrekar Said About Veer Savarkar Film
Exclusive : ‘वीर सावरकर’ चित्रपट का सोडला? अखेर महेश मांजरेकरांनी सांगितलं कारण, म्हणाले, “रणदीप हुड्डाने…”

चिपळूणमधले धऱणं फोडणारे खेकडे एकत्र तिकडे गेले

चिपळूणमधले धरणं फोडणारे खेकडे एकत्र गेले आहेत. खेकडा तिरकाच चालणार, त्याचं काय करायचं तुम्हाला माहीत आहे. आज सोमवार आहे खेकड्याला सोडून द्या आज. अमावस्या, पौर्णिमा कधी आहे ते बघा असा टोलाही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. आपण सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. न्याय मिळेल अशी अपेक्षा सर्वोच्च न्यायालयाकडून आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या बरोबरीने सर्वात मोठं न्यायालय तुम्ही आहात, माझं जनता न्यायालय आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले. आज माझे हात रिकामे आहेत, तरीही तुम्ही सगळे आलात. एकही माणूस भाड्याने आणलेला नाही. सरकार आपल्या दारी म्हणत काही लोक येतात, त्यांच्या कार्यक्रमात अर्ध्या खुर्च्याही रिकाम्या असतात.

२०१४ आणि २०१९ मध्ये माझा पाठिंबा का घेतला होतात?

भारतीय जनता पक्ष असं मी सभ्यपणे बोलतोय. बाळासाहेबांचे विचार सोडले असं जे म्हणतात त्यांना मी कमळाबाई म्हणतो. कमळाबाई शब्द बाळासाहेबांनी दिला. मी घराणेशाहीवाला आहे, बाळासाहेबांचे विचार माझ्याकडे आहेतच. पंतप्रधान घराणेशाहीच्या विरोधात जे टाहो फोडत आहेत त्यांना प्रश्न आहे २०१४ मध्ये मीच पक्षप्रमुख होतो, आत्ताचे जे सांगत आहेत की हे पक्षप्रमुखच नाहीत. मग तुम्ही पाठिंबा कुणाचा घेतला होता? २०१९ मध्ये मला तुम्ही का बोलवलं होतं? अमित शाह यांनी मला का बोलवलं होतं? अमित शाह मातोश्रीवर का आले होते? मिंध्याकडे का गेला नाहीत ? तोपर्यंत यांना माहीत होतं की हा पक्षप्रमुख आहे.

घराणेशाहीवर बोलणारा माणूस घरंदाज हवा

घराणेशाहीबद्दल बोलणारा माणूस घरंदाज असला पाहिजे. त्याने त्याचं घर-दार कुटुंब व्यवस्थित सांभाळलं पाहिजे, मग तो माणूस घराणेशाहीवर बोलला तर मी समजू शकतो. २०१४, २०१९ ला घराणेशाही नव्हती का. ते जय श्रीराम म्हणत आहेत मी त्यांना हXXXX म्हणतो आहे. तुमचं भांडं जे जनतेच्या न्यायालयात आम्ही फोडलं, त्यानंतर काय म्हणणं आहे? शिवसेना कुणाची आहे? कळलं ना? यांचा कारभार कसा आहे. चोराला थोडीशी लाज असते. त्यामुळे ती म्हण आहे चोरीचा मामला आणि हळूहळू बोंबला. यांचं तसं नाही चोरीचा मामला आणि जोरजोरात बोंबला. मग मी त्यांना सांगेन की बोंबला आता होळी येतेच आहे. असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपावर जोरदार टीका केली.

हे पण वाचा- “पुरणपोळी, ओल्या काजूची उसळ, मोदक आणि…”, उद्धव ठाकरेंसाठी राजन साळवींच्या घरी खास बेत

रामराज्य आल्याचे बोर्ड यांनी लावले आहेत. परवा यांच्या आमदारांनी जो गोळीबार केला त्याला हे रामराज्य म्हणत आहेत. अयोध्येत रामाचं मंदिर बांधलं आहे आणि राज्यांमध्ये आयारामांचं मंदिर बांधत आहेत, जेवढा मोठा चोर भाजपात जातो तेवढं मोठं पद त्याला मिळतं अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली.