धुळे लोकसभेच्या नवनिर्वाचित खासदार शोभा बच्छाव यांच्यावर भाजपाकडून गंभीर आरोप करण्यात आला आहे. बकरी ईदच्या निमित्ताने शोभा बच्छाव यांनी गोवंश कत्तलीसाठी प्रशासनावर दबाव टाकल्याचा आरोप आहे. हा दबाव अयशस्वी ठरला असला तरीही ही वोट जिहादची परतफेड आहे का असा प्रश्नही विचारण्यात आला आहे. दरम्यान, भाजपा महाराष्ट्रच्या एक्स खात्यावरून एक कथित ऑडिओ शेअर करण्यात आला आहे. या ऑडिओमधील आवाज शोभा बच्छाव यांचाच आहे, याची आम्ही पुष्टी करत नाही.

भाजपाने शेअर केलेल्या ऑडिओमध्ये नेमकं काय?

भाजपाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये नगरसेवकांचे बंधू अब्दुल लतीफ डॉन आणि धुळे लोकसभेच्या खासदार शोभा बच्छाव यांचा आवाज असल्याचा दावा भाजपाने केला आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

अब्दुल लतीफ डॉन – मी मालेगावहून मन्सूर नगरसेवकाचा भाऊ बोलतोय.

शोभा बच्छाव – हो बोला.

अब्दुल लतीफ डॉन – माझ्या आईचं निधन झालंय. तुम्ही मला माझ्या आईसारख्या आहात. ताई मी असं बोलतोय की आम्ही तुमच्यासाठी प्रयत्न करून मालेगवात तुमच्यासाठी रोजा ठेवून, जे शक्य आहे ते करून तुम्हाला निवडून आणलं.

शोभा बच्छाव – बरोबर आहे.

अब्दुल लतीफ डॉन – एक कोटीच्या वर कॉटन मार्केटमध्ये प्राण्यांचा माल आहे. पण त्यांनी गेम केलाय आई. मी तुम्हाला ताई नाही आई बोलणार. सर्व पैसा घेतला. तिथे लष्कर तैनात करण्यात आलं आहे. देवाच्या दयेने आम्हाला मदत करा. आम्ही तुम्हाला जिंकवलं ना.

शोभा बच्छाव – मी पोलिसांशी बोलले आहे.

अब्दुल लतीफ डॉन – तुम्ही माझा फोनही उचलत नाही. तुम्ही माझ्या आईसारख्या आहात. तुम्ही काहीही करा. आमच्या मेहनतीचा पैसा आहे.

शोभा बच्छाव -मी एसीपींशी बोलले आहे. तिथे कोण लोक आहेत?

अब्दुल लतीफ डॉन – तुम्ही काहीही करा. तुम्ही लोकांसाठी ताई असाल, माझ्यासाठी आई आहात. माझ्या आईला जाऊन दोन वर्षे झाली आहेत. आमच्या मेहनतीचा पैसा आहे. कोट्यवधींचा माल जमा केला आहे त्यांनी.

शोभा बच्छाव – कोणी माल जमा केला आहे.

अब्दुल लतीफ डॉन – कॉटन मार्केटमध्ये लष्कर बसले आहेत. पोलीस अधिकारी आहेत. तुम्ही समजू घ्या.

शोभा बच्छाव – अनिकेत भारती यांच्याशी बोलतो असं एसपी बोलले.

अब्दुल लतीफ डॉन – आज दुसरा दिवस गेला. उद्याचाही दिवस गेला तर कुर्बानी कशी होणार.

शोभा बच्छाव – काय माल आहे? तुमचा.

अब्दुल लतीफ डॉन – जनावर आहेत.

शोभा बच्छाव – पण कोणता जनावर आहे. बकरी की बैल आहे?

अब्दुल लतीफ डॉन – तुम्ही माझं संपूर्ण ऐका.. तुम्ही मला ओळखता का. तुम्ही मला पाहिलंत का. तरीही मी तुम्हाला मानतो ना. तसंच, माझ्या मुस्लिम बांधवांचा माल आहे तो.

शोभा बच्छाव – ठीक आहे. मी भारतीसाहेबांशी चर्चा करते..

अब्दुल लतीफ डॉन – तुम्हाला कोणी त्रास दिला तर मला सांगा. मी तुम्हाला तुमच्या मुलासारखा आहे. तुमचा मुलगा तुमच्याशी बोलत आहे. माझी आई गेली आहे.

हेही वाचा >> नव्या लोकसभेचे नवे चेहेरे: नशीबवान; डॉ. शोभा बच्छाव ,धुळे, काँग्रेस

या संपूर्ण कथित ऑडिओमध्ये अब्दुल लतीफ डॉन शोभा बच्छाव यांच्याशी बोलत असताना रडताना ऐकू येत आहे. दरम्यान या ऑडिओच्या सतत्येबाबत अद्याप कोणताही खुलासा आलेला नसून वरील सर्व आरोप भाजपा महाराष्ट्राकडून करण्यात आले आहेत.

“काँग्रेसच्या हाताची गोवंश कत्तलला साथ… धुळे लोकसभेच्या खासदार शोभा बच्छाव यांचा गोवंश कत्तलीसाठी प्रशासनावर दबाव अयशस्वी. मात्र ही VOTE जिहादची परतफेड आहे का? हिंदूंच्या भावनांना आव्हान देण्याचे काम करत मतांसाठी धार्मिक तुष्टीकरण करणे काँग्रेसचा हा अजेंडा जनतेने आता ओळखला आहे”, अशी टीकाही भाजपाने केली आहे.

Story img Loader