सातारा जिल्हा बँक तसंच अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे आणि भाजपा आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. शशिकांत शिंदे यांनी शिवेंद्रराजेंना अध्यक्ष होण्यासाठी माझी शिफारस कमी पडली अशी बोचरी टीका केली होती. त्यांच्या या टीकेला शिवेंद्रराजेंनी उत्तर दिलं असून थेट इशाराच दिला आहे. त्यांच्या या वक्तव्याची सध्या जिल्ह्यात चर्चा रंगली आहे.

शिवेंद्रराजे भोसलेंना सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं अध्यक्षपद न मिळाल्याने शशिकांत शिंदे यांनी खोचक टीका केली होती. “मी निवडून आलो असतो तर शिवेंद्रराजेंची शिफारस पवार साहेबांकडे करु शकलो असतो. याआधी शिवेंद्रराजे भोसले हे अध्यक्ष झाले होते तेव्हा सुद्धा पवार साहेबांकडे मीच शिफारस केली होती,” असं शशिकांत शिंदे यांनी म्हटलं होतं. माझाच पराभव झाल्यामुळे माझ्यासारख्याची शिफारस कमी पडली आणि त्यामुळेच शिवेंद्रराजे अध्यक्ष होऊ शकले नाहीत, असा टोला यावेळी त्यांनी लगावला होता.

jitendra awhad ajit pawar l
“नशीब त्यांनी डॉक्टरांना विषाचं इंजेक्शन…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला
udayanraje bhosale yashwantrao chavan marathi news
“यशवंतराव चव्हाणांनी संपूर्ण आयुष्य जनतेला समर्पित केले”, खासदार उदयनराजेंचे गौरवोद्गार
beed district loksabha marathinews, dhananjay munde marathi news
मराठा समाजाचा रोष कमी करण्यासाठी धनंजय मुंडे यांचा बैठकांवर जोर, मराठा भवन बांधून देण्याचे आश्वासन
Devendra Fadnavis and Uddhav Thackeray
“तुमच्या जाण्यायेण्याचा खर्च मी करतो, फक्त तुम्ही…”; उद्धव ठाकरे यांची देवेंद्र फडणवीसांना खुली ऑफर

शिवेंद्रराजेंचा इशारा

शिवेंद्रराजे यांनी शशिकांत शिंदेंच्या टीकेला उत्तर दिलं असून म्हटलं आहे की, “जिल्हा बँकेचं अध्यक्षपद मलाच मिळावं असा माझा मुळीच अट्टाहास नव्हता. मला पाच वर्ष अध्यक्ष करण्यासाठी तुम्ही हरकत घेतली होती हे विसरलात का?”.

“शशिकांत शिंदे यांचं वक्तव्य सहानुभूती मिळवण्यासाठी असून स्वतःचं राजकारण आणि गटबाजीमुळे त्यांचा पराभव झाला आहे. त्यांनी आपली लोकं सोबत का राहिली नाहीत याचं आत्मपरीक्षण करावं. आपल्या पराभवाचं खापर माझ्यावर फोडू नये,” असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी तुम्ही हवं तेवढं वातावरण तापवा, आम्ही तुम्हाला थंड करायला तयार आहोत. तुम्हाला थंड करून परत घरी पोहचवण्याची ताकद आमच्यात आहे असा सज्जड दमही भरला.

“शशिकांत शिंदे यांनी माझ्यासाठी कधीच शिफारस केली नसून मी सुरुवातीला चेअरमन झालो त्या बैठकीतसुद्धा त्यांनी माझ्या पाच वर्षांच्या चेअरमनपदाला विरोध दर्शविला होता,” असं शिवेंद्रराजे म्हणाले.