“वारकरी भक्तांना बसवुनी घरी, फोटोमध्ये झळकती मुख्यमंत्री…”

भाजपा प्रवक्ते केशव उपाध्येंनी विविध मुद्य्यांवरून मुख्यमंत्र्यांवर केली टीका, जाणून घ्या काय म्हणाले आहेत.

BJP spokesperson Keshav Upadhyay has targeted the state government
जनतेचे जिणे हराम, मुख्यमंत्र्यांचे घरातून काम…असंही केशव उपाध्ये म्हणाले आहेत.(संग्रहीत छायाचित्र)

करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे यंदा देखील राज्यभरातील वारकऱ्यांना आषाढी एकादशी निमित्त लाडक्या विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाता आलेले नाही. तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज उद्या आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरात होणाऱ्या महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सपत्नीक पंढरपूरकडे रवाना झाले. दरम्यान, दुपारी साडेतीनच्या सुमारास मुख्यमंत्र्यांचा ताफा मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरुन पंढरपूरच्या दिशेने जाताना प्रसारमाध्यमांच्या कॅमेरांनी तो टीपला. या पार्श्वभूमीवर व विविध मुद्द्यावरून भाजपा प्रवक्ते केशव उपाध्येंनी मुख्यमंत्र्यांवर काव्यात्मक टीका केली आहे.

“जनतेचे जिणे हराम, मुख्यमंत्र्यांचे घरातून काम…पावसाने मुंबईचा चक्का जाम, मुख्यमंत्र्यांचे घरातूनच काम…एमपीएससी विद्यार्थ्याचा जीवनाला रामराम, तरीही मुख्यमंत्र्यांचे घरातूनच काम. तुका म्हणे माझा विठ्ठल झाकोळला… वारकरी भक्तांना बसवुनी घरी, फोटोमध्ये झळकती मुख्यमंत्री…” अशा शब्दांमध्ये केशव उपाध्ये यांनी टीका केली आहे.

या ट्विटमध्ये केशव उपाध्ये यांनी पावसामुळे मुंबई जलमय झाल्यावरून देखील मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. तसेच, पुण्यात एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही दोन वर्षांपासून मुलाखत न झाल्याने स्वप्निल लोणकर या तरूणाने केलेल्या आत्महत्येवरून देखील मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. जनतेचं जगणं कठीण होत असताना मुख्यमंत्री मात्र घरातूनच काम करत असल्याचं केशव उपाध्ये म्हणत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bjp spokesperson keshav upadhyay criticizes chief minister uddhav thackeray msr

ताज्या बातम्या