कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यानंतर राज्यातलं राजकारण चांगलंच तापलेलं आहे. महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांनी कंगनावर टीकेची झोड उठवत तिने मुंबईत राहू नये असं म्हटलं आहे. विशेषकरुन शिवसेनेने कंगनाविरोधात आंदोलन तीव्र करत मुंबईत कंगनाच्या पुतळ्याला जोडे मारले. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही कंगानवर टीका करताना मुंबई ही मराठी माणसाचीच आहे असं ठामपणे सांगितलं. कंगनावर टीका करताना संजय राऊतांनी हरामखोर मुलगी असा उल्लेख केल्यामुळे सध्या त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. अनेकांनी राऊतांनी माफी मागावी असं म्हटलंय. विरोधकही याप्रकरणी शिवसेनेला लक्ष्य करत आहेत.

यावर संजय राऊतांनी रविवारी सकाळी एक सूचक ट्विट करत विरोधकांना इशारा दिला.

संजय राऊतांच्या या ट्विटला भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. पाहूयात काय म्हणाले आहेत संबित पात्रा…

कंगना प्रकरणावर भाजपाने सावध प्रतिक्रीया दिलेली आहे. कंगनाच्या वक्तव्याचं भाजपा समर्थन करत नाही. परंतु सुशांत सिंह मृत्यूप्रकरणात सुरु असलेल्या चौकशीवरुन लक्ष हटवण्यासाठी हा प्रकार होत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. त्यामुळे आगामी काळात या प्रकरणी नेमक्या काय घडामोडी घडतायत ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.