भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावती दौऱ्यावर असताना महाविकासआघाडीच्या सत्ताकाळातील कारभारावर टीका केली आहे. महाविकासआघाडीच्या काळात विकास रखडल्याने जनतेमध्ये चीड निर्माण झाली आहे. गावाखेड्यातील कार्यकर्ते महाविकासआघाडी आणि शिंदे-फडणवीस सरकारमधील विकासकामांची तुलना करत आहेत. यामुळे २०२४ मधील निवडणुकीत महाविकासआघाडीला उमेदवारदेखील मिळणार नाही, असे बावनकुळे म्हणाले आहेत.

“२०२४ जवळ येईल तेव्हा धक्के बसतील, खूप बॉम्बस्फोट होतील,” भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे विधान

“मराठवाडा, विदर्भाचे वैधानिक विकास महामंडळे महाविकासआघाडी सरकारने बंद केले. त्यामुळे या प्रदेशाचा विकास रखडला आहे. मात्र, आता शिंदे-फडणवीस सरकारने वैधानिक मंडळांची स्थापना केल्यामुळे विकासाला गती मिळणार आहे”, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे. राज्यपालांनी १२ आमदारांची यादी मंजूर केल्यानंतरच वैधानिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात येईल, या तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भूमिकेवरही यावेळी बावनकुळे यांनी हल्लाबोल केला.

सुप्रिया सुळेंच्या पराभवासाठी मास्टर प्लॅन काय? बारामतीतून भाजपा स्टार उमेदवार देणार? बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रोजस १८-१८ तास काम करतात. मात्र, महाविकासआघाजी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयातदेखील येत नव्हते. त्यामुळे या काळात काहाही काम झाले नसल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला आहे. दरम्यान, आगामी निवडणुकीत विरोधकांना मोठ धक्के बसतील, असा इशारा बावनकुळे यांनी दिली आहे.