राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यापासून भाजपा आणि शिवसेनेमध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. नुकतंच भाजपा नेते निलेश राणे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या गाडीचा इन्शुरन्स आणि पोल्युशन सर्टिफिकेटची मुदत संपल्याचं निदर्शनास आणून दिलं होतं. यावरून भाजपाच्या नेत्यांनी सरकारवर खोचक शब्दांत टीका करायला सुरुवात केली असताना भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

२०२४मध्ये काँग्रेसचाच मुख्यमंत्री असेल?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी “२०२४मध्ये काँग्रेसचाच मुख्यमंत्री असेल”, असं विधान केल्यासंदर्भात मुनगंटीवार यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीला टोला लगावला आहे. “याचं उत्तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला विचारा. ते त्यांच्यासोबत ऊठबस करतात. ते योग्य उत्तर देऊ शकतील”, असं मुनगंटीवार म्हणाले आहेत.

ajit pawar sharad pawar (3)
“…तेव्हा शरद पवार म्हणालेले अजितला राजकारण करू द्या, मी शेती करतो”, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितला १९८९ मधला प्रसंग
Udayanraje Bhosle filled the nomination form in a show of strength
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत उदयनराजेंनी भरला उमेदवारी अर्ज
chandrapur lok sabha marathi news, devendra fadnavis chandrapur lok sabha marathi news
मुनगंटीवार चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचा ‘मेकओव्हर’ करतील; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मत
Sunita Kejriwal is likely to become Delhi Chief Minister
सुनीता केजरीवाल यांच्याक़डे मुख्यमंत्रीपद येण्याची शक्यता

“…तर प्रशासनाची अवस्था लक्षात यावी”

“काही पक्षांचे विचार एक्स्पायर झाले आहेत. तरी काही प्रमाणात ते निवडून येतात. पण मुख्यमंत्र्यांच्या गाडीचा इन्शुरन्स एक्स्पायर झाला असेल, तर त्यांच्या आसपासचे अधिकारी कसं काम करतात हे दिसून येतं. जर मुख्यमंत्र्यांच्या गाडीचा इन्शुरन्स काढला जात नसेल, तर सात अजुबे इस दुनिया में, आठवा अजुबा मुख्यमंत्र्यांचं प्रशासन आहे”, असं मुनगंटीवार म्हणाले.

“दाऊद बिचारा इथे यायला घाबरतो आणि हे…”, चंद्रकांत पाटलांचा राज्य सरकारवर खोचक निशाणा!

“जनता यांना सद्बुद्धी देईल”

दरम्यान, राज्यपाल हे ‘भाजपा’पाल झाले असल्याचं विधान मंगळवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं होतं. यासंदर्भात सुधीर मुनगंटीवार यांनी निशाणा साधला आहे. तसेच, काँग्रेसचे केंद्रीय नेते जसे बोलतात, तसेच राज्यातले नेते देखील बोलतात, असा टोला देखील मुनगंटीवार यांनी लगावला आहे.

“काँग्रेसच्या राजकारणाचा स्तर हळूहळू घसरू लागला आहे. मोदींच्या बाबतीत जसे शब्द त्यांच्याकडून वापरले जात होते किंवा राफेलबाबत राहुल गांधींनीही जसे शब्द वापरले होते, मला वाटतं जसे त्यांचे केंद्रीय नेते बोलतात, तसेच राज्यातले नेते देखील बोलतात. राज्यपाल, राष्ट्रपती किंवा सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्याबाबतीत शब्दांचा वापर योग्यपणेच व्हायला हवा. देव अशा नेत्यांना सद्बुद्धी देवो. जनता तर निवडणुकीत अशा नेत्यांना सद्बुद्धी देईलच”, असं मुनगंटीवार म्हणाले आहेत.