शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून तपास यंत्रणांचा चुकीच्या पद्धतीने आपल्याविरोधात वापर केला जात असल्याचा आरोप केला आहे. दिल्लीत पत्रकार परिषद घेताना संजय राऊत यांनी भाजपा नेत्यांना जाहीर इशारा दिला आहे. भाजपाचे नेते वारंवार मला अनिल देशमुखांच्या बाजूच्या कोठडीत जावं लागेल असं सांगत आहेत. तुमची इच्छा असेल तर कोठडीत जाऊ, पण लक्षात ठेवा आमच्या पाठोपाठ त्याच कोठडीत तुम्हालादेखील यावं लागणार आहे असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. दरम्यान भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी टीव्ही ९ शी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली असून संताप व्यक्त केला आहे.

पत्रातून गौप्यस्फोट केल्यानंतर संजय राऊतांचं भाजपाला जाहीर आव्हान; “इच्छा असेल तर कोठडीत जाऊ, पण…”

केजरीवाल तुरुंगात काय खातात? ईडीच्या आरोपानंतर वकिलांनी न्यायालयात दिला ४८ जेवणांचा तपशील; इन्सुलिनबाबत न्यायमूर्ती म्हणाले…
deputy leader of Shiv Sena Thackeray group Sushma Andhare criticized BJP
‘‘…हा तर भाजपाचा डीएनए, आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही” सुषमा अंधारे यांची टीका, म्हणाल्या…
in Gadchiroli charmoshi taluka s Villagers Oppose Land Acquisition for Iron Project BJP Faces Backlash in Lok Sabha Campaign
भूसंपादनावरून संतप्त ग्रामस्थांकडून भाजपचे ‘बॅनर’ लावण्यास मनाई , प्रचारासाठी गेलेल्या कार्यकर्ते व नेत्यांनाही परत पाठवले
Sanjay Shirsat on Raj Thackeray GudhiPadva
राज ठाकरे आणि महायुतीमध्ये काय ठरलं? संजय शिरसाट म्हणाले, “यावेळी गुढीपाडवा मेळाव्यात…”

“संजय राऊतांना महाराष्ट्राची जनता गांभीर्याने घेत नाही. त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या माहिती नाहीत. ते राज्यसभेचे सदस्य आहेत, पण ज्या पद्धतीने ते भाष्य करतात त्यामुळे ते राज्यसभेचा गौरव वाढवत नाहीत. राज्यसभेच्या सदस्याची उंची कशी नसावी याचं हे एक मूर्तीमंत उदाहरण आहे,” अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

मुंबईचा दादा शिवसेना आहे – संजय राऊत

“आम्ही जेलमध्ये गेल्यास तुम्हालाही टाकू हे वाक्यच घटनेच्या चौकटीत गांभीर्याने घेतलं पाहिजे. याचा अर्थ आम्ही चुका करतो, तुम्ही दुर्लक्ष करा आम्ही करतो. देशाच्या स्वातंत्र्याचा मंगलकलश हा गुंडाराजसाठी दिला आहे का? उद्या कोणीही कोणत्या पक्षाचा चुकत असेल तर आमची चौकशी थांबवा आम्ही तुमची करणार नाही ही वाटाघाडी जनतेला कशी पटेल? एकमेकांच्या चुका पोटात घालायच्या आहेत का?,” अशी विचारणा सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

“ज्याचं हातावर पोट आहे तो तुमच्यावर विश्वास टाकून मतदानासाठी दोन दोन तास रांगेत उभा राहतो, भारतमाता की जय म्हणतो आणि तुम्ही सौदेबाजी करता. आज महाराष्ट्र कोणत्या दिशेने चालला आहे. सुडाच्या राजकारणाबद्दल बोलता आणि तुम्ही नारायण राणेंवर गुन्हा दाखल केला. बाळासाहेबांना अटक करणाऱ्या छगन भुजबळांच्या मांडीला मांडी लावून बसलात आणि आम्हाला तत्वज्ञान देता,” असंही यावेळी ते म्हणाले.

महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी संजय राऊतांना धमकी; म्हणाले, “मदत करा, अन्यथा माजी केंद्रीय मंत्र्यांप्रमाणे तुम्हालाही…”

“शिवसेनेचा जो दबदबा होता तो आता राहिलेला नाही. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण म्हणणारी शिवेसना आता १०० टक्के राजकारणात गेली आहे. बाळासाहेबांची शिवसेना संपवण्यासाठीची ही पत्रकार परिषद होती,” असंही सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

संजय राऊत काय म्हणाले आहेत?

“महाराष्ट्रात सरकार आल्यापासून मी त्यांची वेदना समजू शकतो. त्यांनी राजकीय लढाई लढावी. हे क्रिमिनल सिंडिकेट चालवत आहेत. सध्या ईडी आणि इतर यंत्रणा भाजपा किंवा त्यांच्या मालकांच्या क्रिमिनल सिंडिकेटचा भाग बनले आहेत. आजचं पत्र हा ट्रेलरही नाही, ट्रेलर अजून यायचा आहे. आजचं पत्र फक्त माहितीसाठी लिहिलं आहे. ईडीचे लोक कशाप्रकारे सिंडिकेट चालवतात, यांचे स्व:तचे आर्थि घोटाळे कसे आहेत, मनी लॉण्ड्रिंग करतात, ब्लॅकमेल करतात, धमकावतात आणि यांचे वसुली एजंट बाहेर आहेत हे पुराव्यानिशी सिद्ध करणार,” असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

“ही फक्त सुरुवात आहे”

“हे ठाकरे परिवार, आमच्या प्रमुख नेत्यांना, शरद पवारांच्या परिवाराला बदनाम करत आहेत. महाराष्ट्रातही तपास यंत्रणा तपास करतील. तुम्ही सर्व हातात घेत आहात. तुम्ही मुंबई, महाराष्ट्राच्या पोलिसांपेक्षा मोठे आहात का? तुम्ही संघराज्य प्रणालीची वाट लावत आहात. हुकूमशाही पद्धतीने राज्य करणार असाल तर तुमची पोलखोल करावी लागेल. आतापर्यंत आम्ही राष्ट्रीय एकात्मता, देश म्हणून गप्प बसलो आहोत. माझी मुख्यमंत्री, महाविकास आघाडी तसंच इतर नेत्यांशी चर्चा झाली आहे. ही फक्त सुरुवात आहे,” असं राऊत म्हणाले आहेत.

“पवार कुटुंबाकडे पाच दिवस जाऊन ईडीचे लोक बसले होते. नेत्यांची नावं घ्या असं त्यांचं म्हणणं होतं. हेच आमच्या बाबतीच घडत आहे. आम्ही गुडघे टेकू असं वाटतं का? हे भाजपाचे नेते वारंवार मला अनिल देशमुखांच्या बाजूच्या कोठडीत जावं लागेल असं सांगत आहे. तुमची इच्छा असेल तर कोठडीत जाऊ, पण लक्षात ठेवा आमच्या पाठोपाठ त्याच कोठडीत तुम्हालादेखील यावं लागणारआहे. कारण तुमची पापं जास्त आहेत. आम्ही शुद्ध आहोत. ईडीला कायदेशीरपणे ज्या कारवाया करायच्या आहेत त्या कराव्यात. पण मीदेखील ईडीच्या कार्यालयात काय सुरु आहे याचा पर्दाफाश कऱणार आहे,” असंही ते म्हणाले आहेत.

“जबरदस्ती, दादागिरी केली जात आहे. बाहेरच्या यंत्रणा महाराष्ट्राच्या नागरिकांना बेकायदेशीर डांबून ठेवत आहेत. मुंबई पोलिसांनी यांच्यावर कारवाई केली पाहिजे. हे बाहेरचे लोक सुपाऱ्या घेऊन येतात आणि दोन दिवस धमक्या देत डांबून ठेवतात. यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. यांच्याविरोधात काहीजण एफआयआर दाखल करणारे आहेत,” अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

“ईडीच्या कार्यालयाबाहेर पत्रकार परिषद घेणार”

“सूत्रधार कोण आहेत? ईडी कार्यालयात जाऊन बेकायदेशीरणे भाजपाचे लोक बसतात, त्यांना माहिती, आदेश देतात. मी फडवणीसांना आवाहन करत आहे. त्यांना माहिती आहे मला काय सांगायचं आहे,” असं सूचक विधान संजय राऊत यांनी केलं.

“उद्धव ठाकरेंच्या कुटुंबीयांनाही खूप त्रास दिला जात आहे. रोज कोणीतरी उठतं आणि बेवड्यासारखा बडबडतो नंतर ईडी त्याच्यावर कारवाई करतं. मी मागेही म्हणालो होतो की, आम्ही तुमच्या घरात घुसलो तर नागपूरलाही जाता येणार नाही,” असा इशारा संजय राऊत यांनी यावेळी दिला. संजय राऊतांनी यावेळी ईडीच्या कार्यालयाबाहेर पत्रकार परिषद घेणार असल्याचं सांगितलं आहे.