सांगली : लोकसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे आणि त्यांचा पक्ष दिसणार नाहीत. त्यानंतर भाजप ढेकर देईल असे उबाठा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी सकाळी सांगलीत माध्यमांशी बोलताना सांगितले.

सांगली दौर्‍यावर आलेल्या खा. राऊत यांनी शनिवारी सकाळी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, पंतप्रधान पदाचा निर्णय इंडिया आघाडीत एकत्र बसून घेतला जाईल. उध्दव ठाकरे पंतप्रधान का असू नयेत असा सवाल करून ते म्हणाले, जर ठाकरेंना पंतप्रधान पदाची संधी मिळाली तर शरद पवार यांच्यासह सर्व घटक पक्षाचे नेते निश्‍चितपणे त्यांना पाठिंबा देतील. पंतप्रधान पदाचा मान महाराष्ट्राला का मिळू नये? आम्ही शरद पवार यांना ही संधी मिळेल याची वाट पाहत होतो. मात्र, अंतर्गत वादामुळे महाराष्ट्राला ही संधी मिळू शकली नाही असेही ते म्हणाले.

devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Rohini Khadse Raksha Khadse
रोहिणी खडसे भाजपात जाणार?, रक्षा खडसेंच्या आवाहनावर प्रतिक्रिया देत म्हणाल्या…
pankaja munde manoj jarange (1)
“ही गोपीनाथ मुंडेंची औलाद कधी…”, मनोज जरांगेंवरील कथित टीकेवर पंकजा मुंडेंचा खुलासा
uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO
Shiv Sena Thackeray Group Leader Chandrakant Khaire Announces His Political Retirement
मोठी बातमी! चंद्रकांत खैरेंनी केली राजकीय निवृत्तीची घोषणा, म्हणाले, “अंबादास दानवे..”
rohit pawar on ajit awar
“शरद पवारांच्या व्याधीवर कुणी बोललं नाही, कारण…”, अजित पवारांसमोरच वक्त्याचं विधान; रोहित पवार म्हणाले, “समोर असता तर कानाखाली…”!
What Bhai Jagtap Said?
भाई जगताप यांचं मोठं वक्तव्य, “मी काँग्रेस पक्षासाठी ४३ वर्षे दिली आहेत, आता…”

हेही वाचा…सोलापूर: भाजप उमेदवारांच्या शक्तिप्रदर्शनात चोरट्यांची ‘हाथ की सफाई’

उध्दव ठाकरे यांनी फडणवीस यांच्याबाबत केलेले खुलासे खरे असून नाशिकमधून मंत्री छगन भुजबळ निवडून येऊ शकत नसल्यानेच उमेदवारी बदलण्यात आली असेही खासदार राऊत म्हणाले.