scorecardresearch

‘भाजपा सर्वाधित ग्रामपंचायती जिंकेल’; भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांचा विश्वास

मोहोळ म्हणाले, ग्रामपंचायत विधानसभा व लोकसभेचा पाया असते, स्थानिक स्वराज्य संस्था भक्कम असेल तर गावचा परिपूर्ण विकास होत असतो

‘भाजपा सर्वाधित ग्रामपंचायती जिंकेल’; भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांचा विश्वास
भाजपाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ (संग्रहित छायाचित्र)

भाजपा ग्रामपंचायत निवडणूक ताकदीने लढवून सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकेल, असा विश्‍वास भाजपाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला. सांगली जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूकी संदर्भात भाजपाची आढावा बैठक रविवारी सांगलीत पार पडली. या बैठकीमध्ये मोहोळ बोलत होते.

हेही वाचा- ‘राहुल गांधींचं चारित्र्यहनन कधीपासून आणि कुणी सुरू केलं?’, बाळासाहेब थोरातांनी ट्वीट केलेला Video चर्चेत

या बैठकीस पालकमंत्री सुरेश खाडे, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, आ. सुधीर दादा गाडगीळ, माजी आ. विलासराव जगताप, माजी आ. राजेंद्र आण्णा देशमुख, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मा. मकरंद देशपांडे,जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील, सम्राट महाडिक, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश सरचिटणीस मोहन व्हनकंडे, जिल्हा संघटन सरचिटणीस मिलिंद कोरे, सुरेंद्र चौगुले उपस्थित होते.

यावेळी बोलताना मोहोळ म्हणाले, ग्रामपंचायत विधानसभा व लोकसभेचा पाया असते, स्थानिक स्वराज्य संस्था भक्कम असेल तर गावचा परिपूर्ण विकास होत असतो, संपूर्ण राज्यासह सांगली जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत भाजपा एक संघपणे लढणार आहे. यावेळी सर्वाधिक ग्रामपंचायती भाजप जिंकेल.

हेही वाचा- “पवनराजेंच्या मुलाशी ‘सामना’ झाला अन् आगीशी…”, निंबाळकरांनी पाटलांना डिवचलं; म्हणाले, “कधीही भिडायला तयार”

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत प्रगतीपथावर जात असून राज्यामध्ये देखील सर्वसामान्यांना आपलेसे वाटणारे सरकार शेतकरी उपेक्षित व सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे. सर्वोङ्ख न्यायालयाने गायरान जमिनीवरील अतिक्रमणे काढण्याचा निर्णय दिला होता, मात्र या सक्षम सरकारने गायरान वरील अतिक्रमणे कायम करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मते सरकार बद्दल आपुलकीची भावना आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-12-2022 at 19:49 IST

संबंधित बातम्या