दिगंबर शिंदे, लोकसत्ता 

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने वर्चस्व सिद्ध केले असले तरी कोणाची शक्ती पडद्याआड कार्यरत होत्या यावरून दोन्ही काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. आघाडीचे सर्व उमेदवार कागदावर प्रबळ असूनही भाजपला यश कसे मिळाले, कोणी कोणाला रसद पुरवठा केला यावरून संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. यावरून राष्ट्रवादीचे आमदार अरुण लाड यांनी काँग्रेसवर दगाबाजीचा आरोप केला आहे, तर जतमध्ये काँग्रेसच्या पराभवाला राष्ट्रवादीची मदत कारणीभूत असल्याचा आरोप पराभूत झालेले आ. विक्रम सावंत यांनी केला आहे. या कुरघोडीच्या राजकारणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये उभय काँग्रेसवर त्याचा परिणाम होऊ शकतो.

rahul gandhi wayanad election
सीपीआयने उमेदवार दिल्यानंतरही काँग्रेसला वायनाडमधून राहुल गांधीच का हवेत?
Naran Rathwa news
काँग्रेस नेत्यांची पक्ष सोडण्याची मालिका सुरूच! पाच वेळा खासदार राहिलेल्या नारन राठवा यांचा भाजपात प्रवेश; कारण काय?
Chahal, Bhide to be transferred after ECI orders
चहल, भिडे यांची बदली अटळ; राज्याची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली
It was decided in a meeting of MP that Shinde Group will hold 18 Lok Sabha seats mumbai
शिंदे गट लोकसभेच्या १८ जागांवर ठाम,खासदारांच्या बैठकीत निर्णय

जिल्हा बँकेची निवडणूक नेत्यांच्या प्रतिष्ठेची होती. आर्थिक हितसंबंध गुंतले असल्याने आणि सहकारातील उद्योगांना लागणारी आर्थिक रसद बँकेतूनच मिळत असल्याने जिल्ह्य़ातील सर्व पक्षीय दिग्गज नेत्यांचा बँकेच्या संचालक मंडळात जाण्याचे मनसुबे होते. प्रारंभीच्या काळात सहकारात राजकारण असू नये या तत्त्वाखाली आपले मांडलिकत्व असलेल्यांनाच संधी देण्याचे मनसुबे काही नेत्यांनी रचले होते, मात्र प्रत्येकाची भूमिका ही मला एक वेळ संधी नसली तर चालेल, पण स्थानिक पातळीवर शिरजोर होणाऱ्याची आर्थिक रसद कापली गेली पाहिजे अशीच भूमिका होती. यातून तडजोडीचे दोर निवडणूक जाहीर झाल्यानंतर कापले गेल्याने भाजपने स्वबळावर निवडणुका लढविण्याचे ठरवले. पक्ष म्हणून भाजप या निवडणुकीत उतरलाच नव्हता. त्यापेक्षा आपल्या संस्थांची पाठराखण करण्यासाठीच नेते मैदानात उतरले होते. मर्यादित मतदार हेही यामागील कारण असले तरी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी ही पक्षीय पातळीवर न होता, गटातटाच्या पातळीवर झाली. तरीही भाजपप्रणीत आघाडीला मिळालेल्या चार जागा या पक्षनिष्ठेपेक्षा आघाडीतील फाटाफुटीतून मिळाल्या हे उघड गुपित आहे.

जतमध्ये धक्कादायक निकाल

जत तालुका विकास सोसायटी गटामध्ये आमदार सावंत यांना ४०, तर भाजपप्रणीत प्रकाश जमदाडे यांना ४५ मते मिळाली. कागदावर पाहायला गेले तर या तालुक्यात काँग्रेस व राष्ट्रवादीची बेरीज निश्चितच आघाडीचा उमेदवार विजयी होण्याइतपत आहे. तरीही मते फुटली कोणाची हे उघड आहे. राष्ट्रवादीतून बंडखोरी केलेले जमदाडे विजयी होतात याचा अर्थ सरळच आहे. काँग्रेसला कोंडीत पकडून आगामी जिल्हा परिषदेत कात्रजचा घाट दाखवणे हे राष्ट्रवादीचे ध्येय असू शकते. येत्या काही दिवसांवर आलेल्या जत नगरपालिका निवडणुकीत याचे पडसाद उमटणार हे निश्चित.

बँक मतदारसंघातही पराभव

हीच स्थिती पतसंस्था, नागरी बँक गटामध्ये झाली. काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील आणि भाजपप्रणीत आघाडीचे राहुल महाडिक हे विजयी झाले. महाडिक हे वाळवा तालुक्यातील, पण इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीत भाजपचे विद्यमान नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीला जवळचे वाटू लागले आहेत काय अशी शंका येत आहे. तसेच काँग्रेसने या गटात स्वत:पुरते एक मत मागून पाटील यांनी राष्ट्रवादीच्या किरण लाड यांना तिसऱ्या स्थानावर ढकलले. याचा परिणाम लाड यांच्या पराभवात झाला. काँग्रेसचे पाटील यांनी मनापासून काम केले नसल्याचा आरोपच राष्ट्रवादीचे आमदार अरुण लाड यांनी केला असून पलूस, कडेगावमध्ये काँग्रेसला याचे उत्तर भविष्यात द्यावे लागू शकते. जशी काँग्रेसने या गटात आघाडी धर्म पाळला नाही तसाच राष्ट्रवादीने जतमध्ये आघाडी धर्म मोडून पुढचे राजकारण महत्त्वाचे मानले. दोन्ही काँग्रेसमध्ये काही का असेना भाजपला ज्या जागांवर विजय मिळवायचा होता त्या आटपाडी वगळता सर्व जागा मिळाल्या. यामुळे भाजपला वेदना असली तरी दु:ख मात्र फारसे असण्याचे कारण नाही.

जत विकास सोसायटी गटामध्ये मतदारांनी दिलेला कौल मान्य असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोराला साथ देण्यात राष्ट्रवादीचा पुढाकार होता. यामुळे यापुढे मित्रपक्षांशी कसे संबंध ठेवायचे याचा विचार करावा लागणार आहे.

आमदार विक्रम सावंतकाँग्रेस

नागरी बँका, पतसंस्था गटामध्ये आघाडीची मते दोन्ही उमेदवार विजयी करण्यास पुरेशी असतानाही राष्ट्रवादीचे किरण लाड यांचा पराभव झाला. काँग्रेसने यात दगा दिला आहे.

आमदार अरुण लाड, राष्ट्रवादी