scorecardresearch

तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये स्फोट; एक ठार, पाच जखमी

अद्याप या अपघातात एक मृतदेह हाती लागला असून शोध कार्य सुरू आहे.

तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये स्फोट; एक ठार, पाच जखमी

तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील प्लॉट जे-१ मधील कापडाचे उत्पादन करणाऱ्या जखारिया लिमिटेड कंपनी मध्ये झालेल्या भीषण स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला असून अन्य पाच कामगार जखमी झाले आहेत. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा स्फोट घडला असून तीन ते चार किलोमीटर परिसरात स्फोटाचा मोठा आवाज ऐकू गेला आहे. त्यानंतर कंपनीमध्ये मोठी आग लागली. तारापूर अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी असून आग नियंत्रणात आली आहे.

या अपघातामध्ये पाच कामगार जखमी झाले असून जखमींवर बोईसर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अद्याप या अपघातात एक मृतदेह हाती लागला असून शोध कार्य सुरू आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Blast at tarapur industrial estate one killed five injured abn

ताज्या बातम्या