मराठा आरक्षणाविरोधात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपोषण छेडले आहे. ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणार्थ त्यांनी उपोषण सुरू केले असून आज उपोषणाचा सातवा दिवस आहे. गेल्या काही दिवसांपासून लक्ष्मण हाके यांची प्रकृती सातत्याने खालावत जातेय. आता त्यांचा रक्तदाब वाढला असून त्यांना हृदयविकाराचा धोका संभवतो, अशी शक्यता वैद्यकीय अधिकारी अनिल वाघमारे वर्तवली आहे. आज लक्ष्मण हाके यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली.

“आज उपोषणाचा सातवा दिवस आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून त्यांचा रक्तदाब वाढत आहे. आज रक्तदाब तपासला असता १६८/११० आहे. कालपेक्षा वाढलेलाच आहे. पल्स ९८ असून ऑक्सिजन लेव्हल ९८ आहे, ब्लड शुगर ८१ वर आली आहे. यामुळे त्यांच्या हृदयावर दबाव येऊ शकतो. त्यांना त्वरीत रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करणं अत्यंत गरजेचं आहे. ईसीजीही केला आहे, त्यातही बदल आहे. कार्डिओलॉजिस्टचा सल्ला घेणं गरजेचं आहे”, असं वैद्यकीय अधिकारी अनिल वाघमारे म्हणाले.

Om Rajenimbalkar Manoj Jarange Patil
“मराठ्यांच्या अन्नात माती कालवू नका”, मनोज जरांगेंचा खासदार ओम राजेनिंबाळकरांवर संताप; नेमकं प्रकरण काय?
Crime against Bogus National Advisor in Prime Ministers Office Kashmira Pawar and her husband
पंतप्रधान कार्यालयातील बोगस राष्ट्रीय सल्लागार साताऱ्यातील काश्मीरा पवारसह पतीवर गुन्हा
rohit pawar chhagan bhujbal
“छगन भुजबळ पक्ष सोडणार, त्यांच्याबरोबर…”, रोहित पवारांचा दावा; पक्षांतराची वेळही सांगितली
Maratha Reservation Activist Prasad Dethe Suicide News in Marathi
Prasad Dethe: “चिऊ मला माफ कर, जरांगे तुम्ही आरक्षण घेतल्याशिवाय..”; भावनिक चिठ्ठी लिहित मराठा आंदोलकाने आयुष्य संपवलं
Tukaram mundhe
तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली, ‘या’ खात्याचा पदभार स्वीकारण्याचे मंत्रालयाकडून आदेश!
Hajj Pilgrims Die Heat wave
Heat wave : हजसाठी गेलेल्या ५५० भाविकांचा मक्केमध्ये उष्माघाताने मृत्यू, २,००० यात्रेकरू रुग्णालयात दाखल
uddhav thackeray chhagan bhubal
छगन भुजबळ शिवसेनेत येणार? संजय राऊत म्हणाले, “त्यांच्या मनात खदखद आहे, पण…”
IAS Pooja Khedkar father Dilip Khedkar
Pooja Khedkar Father First Reaction : IAS पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “माझ्या मुलीने चूक…”

तसंच, लक्ष्मण हाकेंबरोबर नवनाथ वाघमारेही उपोषणाला बसले आहेत. त्यांचीही प्रकृती खालावली आहे. त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती देताना डॉक्टर म्हणाले, नवनाथ वाघमारे यांचा रक्तदाब ११०\९०, पल्स ८९, ब्लड शुगर ९१ आहे.”

हेही वाचा >> “ओबीसींच्या आरक्षणाला कसा धक्का लागणार नाही हे सांगा”, पंकजा मुंडेंनी सरकारला विचारला जाब; म्हणाल्या, “मराठा आरक्षणाला…”

आरक्षणाला धक्का कसा लागत नाही हे सांगा

सगेसोयरेचा अध्यादेश लागू करण्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी सरकारला अल्टिमेटम दिला आहे. तर, दुसरीकडे सगेसोयरेचा अध्यादेश लागू झाल्यास ओबीसी, एससी आणि एसटीचं आरक्षण बाधित होईल, असा दावा केला जातोय. त्यामुळे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी उपोषणाची हाक दिली आहे. शासन जोपर्यंत ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही हे सांगत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

लक्ष्मण हाके यांच्या समर्थनार्थ अंबड बंदची हाक

लक्ष्मण हाके यांच्या समर्थनार्थ आज जालना जिल्ह्यातल्या अंबडमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला चांगला प्रतिदास मिळत आहे. जालना ते नांदेड महामार्गावर ओबीसी बांधवांनी रास्ता रोको करत गाड्या अडवल्या आहेत. तसंच, सरकारविरोधात घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला आहे. जोपर्यंत सरकार लेखी स्वरुपात आश्वासन देत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार हाके यांनी केला आहे.