Mumbai Maharashtra Election Exit Poll Result Live Updates: महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी आज मतदान पार पडले. यापैकी मुंबई महानगरपालिकेच्या निकालावर सर्वांची नजर असणार आहे. आज सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर मतदार यादीतील घोळ, मतदान केंद्र शोधताना मतदारांना आलेल्या अडचणी, लवकर पुसली जाणारी शाई आणि दुबार मतदानाच्या घटनांमुळे ठिकठिकाणी गोंधळाची परिस्थिती असल्याचे पाहायला मिळाले. मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसह राज्यातील २ हजार ८६९ प्रभागांसाठी मतदान पार पडले आहे. मुंबईतील १७०० उमेदवारांसह राज्यभरात १५,९३१ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर आता एक्झिट पोल्सच्या कलांकडे सर्वांचे लक्ष आहे. मुंबई महानगरपालिका, पुणे आणि पिंपरी-चिंचवडचे प्राथमिक कल हाती आले आहेत.
जेव्हीसी, एक्सिस माय इंडिया – आज तक, प्राब आणि जनमत यांचे कल समोर आले आहेत. तत्पूर्वी २०१७ साली मुंबई महानगरपालिकेत कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या होत्या, त्या पाहून घ्या.
| पक्षाचे नाव | जिंकलेल्या जागा – २०१७ |
| शिवसेना (SHS) | ८४ |
| भारतीय जनता पक्ष (BJP) | ८२ |
| काँग्रेस (INC) | ३१ |
| राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) | ९ |
| महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) | ७ |
| समाजवादी पक्ष (SP) | ६ |
| स्वतंत्र | ५ |
| ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) | २ |
| अखिल भारतीय सेना (IA) | १ |
| एकूण | २२७ |
सर्व एक्झिट पोल्सची आकडेवारी जाणून घेण्यासाठी खालील ब्लॉगमधील अपडेट्स पाहा…
Exit Poll Result Predictions for Mumbai BMC and Maharashtra Election 2026
सांगली-मिरज-कुपवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस (जयंत पाटील) यांना धक्का बसल्याचे दिसत आहे. जेडीएस एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजपाला ७८ पैकी ३१-३७ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भाजपाने २०१७ साली याठिकाणी ४१ जागा जिंकल्या होत्या. बहुमताचा आकडा ४० आहे.
https://twitter.com/jubilant_studio/status/2011793968619798800
BMC Result 2026 : मुंबई महापालिकेत कोणाची सत्ता येणार? एक्झिट पोलची आकडेवारी काय सांगते?
Latur Exit Poll 2026 Result Live: लातूरमध्ये रवींद्र चव्हाणांच्या विधानाचा उलट परिणाम; काँग्रेसला स्पष्ट बहुमत?
लातूर महानगरपालिकेत ७० जागा आहेत. त्यापैकी बहुमताचा आकडा ३६ असून काँग्रेस आघाडीने स्पष्ट बहुमत मिळवल्याचे Exit Poll मधून दिसून येत आहे. जेडीएस एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांचे नाव पुसून टाकण्याचे विधान केले होते. या विधानाचा उलट परिणाम झाल्याची चर्चा आहे.
https://twitter.com/jubilant_studio/status/2011801692178653674
Nashik Exit Poll 2026 Result Live: नाशिक महानगरपालिकेतील ठाकरे बंधूची सभा निष्फळ ठरणार? पाहा जेडीएस एक्झिट पोलचे अंदाज काय सांगतात?
नाशिक महानगरपालिकेतील १२२ जागांपैकी बहुमताचा आकडा ६२ एवढा आहे. त्यापैकी भाजपाला ५४ ते ६२ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर ठाकरेंच्या आघाडीला १० जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
https://twitter.com/jubilant_studio/status/2011807034757562873
KDMC Exit Poll 2026 Result Live: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपा-शिंदेंची सत्ता? Exit Poll चा अंदाज काय
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत १२२ नगरसेवकांची संख्या असून बहुमताचा आकडा ६२ आहे. त्यातील भाजपा ४४-४८ जागा मिळवण्याची शक्यता आहे. तर शिवसेना (शिंदे) ला ५२-५७ जागा मिळण्याची शक्यता आहे.
https://twitter.com/jubilant_studio/status/2011804005597659196
BMC Election Exit Poll : उद्धव ठाकरेंची २५ वर्षांची सत्ता भाजपा मोडीत काढणार? मतदानोत्तर चाचण्या व सर्वेक्षण अहवालानंतर भाजपमध्ये उत्साह...
पनवेल महानगरपालिकेत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज JDS Exit Poll मधून व्यक्त करण्यात आला आहे. ७८ पैकी ६० ते ६५ जागा मिळण्याचा अंदाज जेडीएसने व्यक्त केला आहे.
https://twitter.com/jubilant_studio/status/2011802809700925812
Nagpur Municipal Corporation : नागपूरकरांचा कौल कुणाकडे? काय सांगतात अंदाज?
Thane Exit Poll 2026 Result Live: ठाण्याचा गड शिंदेंनी राखला; पाहा JDS Exit Poll ची आकडेवारी
ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिष्ठा पणाला लागली होती. ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेला ६९ ते ७६ इतक्या जागा मिळाल्याचे जेडीएस एक्झिट पोलच्या अंदाजानुसार दिसत आहे. तर भाजपाला २६ - ३० जागा मिळतील, असे सांगितले आहे. बहुमताचा (६६) आकडा शिंदे सेनेने पार केल्याचे दिसत आहे.
https://twitter.com/jubilant_studio/status/2011805841968734337
BMC Exit Poll Result 2026 : मुंबईत ठाकरे बंधूंना मोठा धक्का? युतीचा महापौर होणार? एक्झिट पोल्सचे आकडे काय सांगतात?
PCMC Election 2026 Exit Poll: होमग्राऊंडवर अजित पवारांना मोठा धक्का, पिंपरी चिंचवडमध्ये भाजपा बाजी मारणार?
Pimpri-Chinchwad Exit Poll 2026 Result Live: पिंपरी चिंचवड महापालिकेत अजित पवारांवर भाजपा भारी?
पिंपरी चिंचवड मनपात अजित पवारांनी भाजपाविरोधात रणशिंग फुंकलं होतं. मात्र भाजपाने आपली सत्ता कायम राखल्याचे दिसत आहे. पाहा JDS Exit Poll चे आकडे काय सांगतात.
https://twitter.com/jubilant_studio/status/2011799975127368099
Maharashtra Exit Poll 2026 Result Live: कोल्हापूरमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही
कोल्हापूरमध्ये ८१ जागांसाठी मतदान पार पडले असून भाजपाने सर्वाधिक जागा जिंकल्याचा अंदाज आहे. तसेच काँग्रेसच्या जागा कमी झाल्याचे कल सांगत आहेत. ८१ नगरसेवकांच्या मनपात बहुमताचा आकडा ४१ आहे.
भाजपा – २९ - ३२
शिवसेना (शिंदे) – १८ -२१
काँग्रेस – १९-२३
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – ९-११
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) – ०१
शिवसेना (ठाकरे) – ३ - ४
मनसे – ०१
BMC Exit Poll 2026 Result Live: मतदानात भाजपाने मारली बाजी, तर उद्धव-राज दुसऱ्या स्थानावर, Axis My India चा अंदाज
मतदानात कोणत्या पक्षाला किती मते मिळाली? याची Axis My India नुसार आकडेवारी (अंदाजित)
भाजपा - २८ टक्के
शिवसेना (शिंदे) - १४ टक्के
शिवसेना (ठाकरे) - २४ टक्के
मनसे - ७ टक्के
राष्ट्रवादी (शरद पवार) - १ टक्के
काँग्रेस-वंचित-आरएसपी - १३ टक्के
इतर - १३ टक्के
Pimpri-Chanchwad Exit Poll 2026 Result Live: Prab Exit Poll नुसार पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपा गड राखण्याची शक्यता
पुण्याप्रमाणेच पिंपरी-चिंचवडमध्येही अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले होते. अजित पवारांनी भाजपावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. महायुतीमधील पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले होते. मात्र एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजपाने बाजी मारल्याचे दिसत आहे.
भाजप - ६४
शिवसेना - ९
राष्ट्रवादी - ५१
शरद पवार गट - २
काँग्रेस - १
मनसे - १
Pune Exit Poll 2026 Result Live: Prab Exit Poll नुसार पुण्यात भाजपाची सत्ता येण्याची शक्यता
पुण्यात महायुतीमधील तीनही पक्ष वेगवेगळे लढत असूनही भाजपाला मोठा लाभ होताना दिसत आहे. दोन्ही राष्ट्रवादींची युती होऊनही भाजपाने सत्ता राखल्याचे दिसून येत आहे.
भाजपा - ९१
दोन्ही राष्ट्रवादी - २३
Bmc Election 2026 live: अॅक्सिस माय इंडिया - आज तकचा कौल महायुतीला
अॅक्सिस माय इंडिया - आज तक यांच्या एक्झिट पोलनुसार मुंबई मनपाची सत्ता महायुतीकडे जाताना दिसत आहे.
एकूण वॉर्ड: २२७
भाजप+शिवसेना: १३१–१५१
यूबीटी+राज ठाकरे: ५८–६८
काँग्रेस+वंचित: १२–१६
इतर: ६–१२
Bmc election 2026 live: ‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच अभिरक्षा कक्षातून बाहेर काढणार’
BMC Election 2026 News: बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ अंतर्गत टपाली मतपत्रिकांबाबत दिलेले एक पत्र चुकून प्रसारित झाले होते. ते पत्र तात्काळ मागे घेऊन सुधारित पत्र देण्यात आले आहे. त्यानुसार, गुरुवार १५ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजता टपाली मतपत्रिकांच्या पेट्या अभिरक्षा कक्षातून बाहेर काढल्या जाणार नाहीत. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणीच्या दिवशीच टपाली मतपत्रिकांच्या पेट्या आणि मतदान यंत्रे अभिरक्षा कक्षातून बाहेर काढण्यात येतील. त्या वेळी प्रभागनिहाय विलगीकरणही होईल. उमेदवार किंवा त्यांचे अधिकृत प्रतिनिधी उपस्थित राहावेत, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
BMC Exit Poll 2026 Result Live: The JVC Exit Poll च्या अंदाजानुसार मुंबईत महायुतीचा झेंडा
मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचे निर्विवाद वर्चस्व असेल असा अंदाज JVC Exit Poll मधून येत आहे. त्यांनी अंदाजित केलेली आकडेवारी खालीलप्रमाणे...
भाजपा-सेना - १२९ - १४६
ठाकरे बंधू आणि शरद पवार - ५४ - ६४
काँग्रेस आणि वंचित - २१ - २५
इतर - ६ - ९
BMC Exit Poll 2026 Result Live: Axis My India नुसार महायुतीचा झेंडा BMC वर फडकणार
Axis My India च्या पोलनुसार, मुंबईत भाजपा-शिंदेंच्या शिवसेनेची सत्ता येणार असल्याचे सांगितले जात आहे. महायुतीला १३१ जागा मिळण्याचा अंदाज आहे.
भाजपा-सेना - १३१ ते १५१
ठाकरे बंधू - ५८ ते ६८
काँग्रेस - १२ ते १६ जागा
घड्याळाचे बटण दाबताच कमळाला मतदान? भाजपा-शिंदेसेनेत तुंबळ हाणामारी; ठाकरेंचा निवडणूक आयोगावर संताप, वाचा ५ घडामोडी
BMC Exit Poll 2026 Result Live: डीव्ही रिसर्चनुसार मुंबईत महायुतीची सत्ता येण्याचा अंदाज
डीव्ही रिसर्चनुसार मुंबईत महायुतीची सत्ता येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
भाजपा-शिवसेना (शिंदे) - १०७ ते १२२ जागा येण्याचा अंदाज
ठाकरे बंधू युती - ६८ ते ८३ जागा येण्याचा अंदाज
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?
भाजपा - ६४,
शिवसेना (शिंदे) - ०९,
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - ५१
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - ०२
काँग्रेस - ०१
मनसे - ०१
Maharashtra Exit Poll 2026 Result Live: पुणे महानगरपालिकेत कुणाची सत्ता येणार?
पुणे महानगरपालिकेमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? जनमत Exit Poll काय ?
भाजपा - ९३,
शिवसेना (शिंदे) - ६,
शिवसेना (ठाकरे) - ७,
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - ४३
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - ८
काँग्रेस - ८
इतर - २-५
BMC Exit Poll 2026 Result Live: मुंबईत सत्तापालट होणार, भाजपाची सत्ता येण्याचा अंदाज
भाजपा-शिवसेनेला (शिंदे) १३८ जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ठाकरे बंधू आणि शरद पवार यांच्या युतीला ६२ जागा मिळण्याचा अंदाज जनमत एक्झिट पोलने व्यक्त केला आहे.
Exit Poll: एक्झिट पोल म्हणजे काय?; कसा व्यक्त केला जातो अंदाज
विश्लेषण : 'एक्झिट पोल' म्हणजे काय? ते कसे काढले जातात? याबाबत कायदा काय सांगतो? जाणून घ्या सविस्तर
BMC Election 2026 Polling Live Updates: अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर खान यांनी बजावला मतदानाचा हक्क
अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर खान यांनीही बीएमसी निवडणुकीत मतदान केले.
BMC Election 2026 Polling Live Updates: अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर खान यांनी बजावला मतदानाचा हक्क
अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर खान यांनीही बीएमसी निवडणुकीत मतदान केले.
BMC Civic Polls 2026 Live: अभिनेत्री शबाना आझमींनी बजावला मतदानाचा हक्क
अभिनेत्री शबाना आझमी यांनीही बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी त्या म्हणाल्या, "कृपया सर्वांनी मतदान करा. मतदानाचा हक्क बजावणे ही आपली जबाबदारी आहे."

महाराष्ट्रात २९ महानगरपालिकांमध्ये निवडणुकीचा संग्राम होत आहे. (Photo - AI ChatGPT)
