बोईसर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षकाला लाच घेताना अटकेत

एका तक्रारीत शिथिलता आणण्यासाठी तक्रारदार यांच्याकडून पंधरा हजार रुपयाची लाच धुमाळ याने मगितली होती.

15 हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले

बोईसर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेश धुमाळ यांनी 15 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे पथकाने रंगेहात पकडले. धुमाळ याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

एका तक्रारीत शिथिलता आणण्यासाठी तक्रारदार यांच्याकडून पंधरा हजार रुपयाची लाच धुमाळ याने मगितली होती. त्यानुसार तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाला कळविले. लाच मागितली असल्याची शहानिशा केल्यानंतर ठाणे पथकाने सापळा रचला व लाच घेताना रंगेहात पकडले.

याप्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. धुमाळ याने स्वतःसह आपल्या लेखनिकासाठीही लाच मागितली असल्याचे सांगितले जाते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Boisar police sub inspector arrested for taking bribe akp

Next Story
गैरव्यवहारात अडकलेल्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत -खडसे
ताज्या बातम्या