२००६ च्या औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरणातील आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायद्याच्या विविध कलमांतर्गत दोषी ठरवल्यानंतर मुंबई सत्र न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र, आता जन्मठेपेची शिक्षा स्थगित करून न्यायलयाने आरोपीस जामीन दिला आहे. बिलाल अहमद अब्दुल रझाक असे आरोपीचे नाव असून दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) मे २००६ मध्ये त्याला अटक केली होती.

काय आहे २००६ औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरण
दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) नांदेड बॉम्बस्फोट प्रकरण, बुलढाण्यात जप्त केलेली स्फोटके आणि मराठवाड्यात २००२ आणि २००३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांच्या घटनांची चौकशी करत होते. चौकशी दरम्यान, त्यांना ९ मे २००६ रोजी औरंगाबादमध्येकाही स्फोटके आणि शस्त्रे नेली जाण्याची शक्यता असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे एटीएसने मनमाड, येवळा, औरंगाबाद रोडवर आपली पथके तैनात केली होती. दुपारी चारच्या सुमारास येवळा जंक्शन येथे पथकाला एक टाटा सुमो जीप मनमाडकडून औरंगाबादकडे जात असल्याचे दिसले. त्यांनी जीप अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र जीप वेगात निघून गेली.

Husband Seeks Court Intervention, habeas corpus, Eloped with Facebook Friend, wife escaped with Facebook Friend, high court nagpur,
“बायको परत मिळवून द्या, फेसबुक मित्राबरोबर पळाली…’ नवऱ्याची उच्च न्यायालयात धाव
nagpur, rape victim girl missing, police started search operation, rape victim girl in nagpur, crime in nagpur, crime news, nagpur news, marathi news,
न्यायालयात गोंधळ घालणारी युवती अचानक बेपत्ता
Rashmi Barve
रश्मी बर्वे प्रकरणावर बुधवारी सुनावणी, जातवैधता प्रमाणपत्रामुळे निवडणूक अर्ज रद्द
Nagpur
नागपूर : पाच जणांची हत्या करणाऱ्या विवेक पालटकरची फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाकडून कायम

एनआयएकडून आरोपपत्र दाखल

पोलिसांनी पाठलाग करुन वाहनाला औरंगाबादजवळ अडवले. जीपमध्ये मोहम्मद आमेर शकील अहमद शेख, अब्दुल अजीम अब्दुल जमील शेख आणि सय्यद जुबेर सय्यद अन्वर कादरी या तीन आरोपींशिवाय मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा सापडला होता. एटीएसच्या म्हणण्यानुसार, हे वाहन जैबुद्दीन अन्सारी उर्फ ​​अबू जुंदाल चालवत होता. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा तो मुख्य सूत्रधार असून जुंदाल याच्यासह इतर सहा जणांना २००६ च्या औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. तसेच भारतात दहशतवादी कारवाया करण्याचा कट रचल्याबद्दल एनआयएने त्याच्यावर आरोपपत्र दाखल केले होते.

अबु जुंदालसह सात जणांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा

मोक्का न्यायालयाने आरोपी अबु जुंदालसह सात जणांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तसेच अन्य दोन आरोपींना १४ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. देशाविरोधात युद्ध पुकारणे, शस्त्रसाठा बाळगणे आणि अन्य आरोप सिद्ध झाल्याने न्यायालयाने या प्रकरणात १२ जणांना दोषी ठरवले होते. उर्वरित तीन आरोपींना ८ वर्षांची शिक्षा सुनावली होती.