लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या पक्षबदलाला सुरुवात झाली आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पक्षांतर केलं असून महाविकास आघाडीतील अनेक नेतेही भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. दरम्यान, यावरून भाजपा नेते आशिष देशमुख यांनी मोठा दावा केला आहे. येत्या काळात राज्यातील दोन्ही विरोधी पक्षनेते भाजपा किंवा भाजपा संलग्न पक्षात सामील होतील, असा दावा त्यांनी केला आहे. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

“मागच्या दहा वर्षांत जे जे कोणी विरोधी पक्षनेते होते, त्यांनी भाजपा किंवा भाजपा संलग्नित होऊन राजकारण करण्याचं ठरवलं आहे. येणाऱ्या काही दिवसांत महाराष्ट्रातील दोन्ही विरोधी पक्षनेते भाजपामध्ये आणि महायुतीमध्ये आल्याशिवाय राहणार नाही”, असा मोठा दावा आशिष देशमुख यांनी केला आहे.

supriya sule marathi news, goa cm pramod sawant marathi news
“सुप्रिया सुळे घरातील वादात अडकल्याने काहीही बोलतात”, गोव्याचे मुख्यमंत्री म्हणाले…
Ahmednagar, Shirdi, election, sujay vikhe patil,
नगर, शिर्डीमध्ये गेल्या निवडणुकीतील प्रतिस्पर्धी यंदा एकत्र
National Conference (NC) Party president Farooq Abdullah and Peoples Democratic Party (PDP) leader Mehbooba Mufti
इंडिया आघाडीत आणखी एक गोंधळ; महबूबा मुफ्ती यांच्याविरुद्ध नॅशनल कॉन्फरन्सने दिला उमेदवार
jalna, lok sabha election 2024, Congress
जालन्यात काँग्रेसचा सावध पवित्रा

हेही वाचा >> “शेतकऱ्यांवर गोळ्या झाडण्याची सरकारची तयारी, इतका जोश चीनच्या सीमेवर दाखवला तर…”, ठाकरे गटाचा संताप

विरोधी पक्षनेत्यांचा ट्रेंड कायम राहील

“सुरुवातीच्या काळात २०१४ साली एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते होते. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्षनेते होते, ते भाजपात आले. काही कालावधीसाठी अजित दादा विरोधी पक्षनेते होते. तेही महायुतीत आले. ही श्रृंखला पुढे चालेल”, असं संकेतही त्यांनी दिले. तसंच, विरोधी पक्षनेत्यांचा ट्रेंड यापुढेही सुरु राहणार असल्याचं ते म्हणाले.

दरम्यान, सध्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते काँग्रेसचे विजय वडेट्टीवार आहेत, तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ठाकरे गटाचे अंबादास दानवे आहेत. आशिष देशमुखांनी केलेल्या दाव्यानुसार विजय वडेट्टीवार आणि अंबादास दानवेही महायुतीत सामिल होतात का, हे पाहावं लागणार आहे.

हेही वाचा >> “इंडिया आघाडीत मतभेद झाले आहेत पण…”, शरद पवार यांचं महत्त्वाचं वक्तव्य

अशोक चव्हाणांबाबतचा दावा ठरला होता खरा

महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये हजेरी लावणारा एक मोठा नेता लवकरच भाजपात सामील होणार, असा दावा आशिष देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर अशोक चव्हाण भाजपावासी झाले. आशिष देशमुखांचा दावा खरा ठरल्याने आता विरोधी पक्षनेत्याबाबत त्यांनी केलेलं विधानही खरं ठरेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.