Vidhan Parishad Election Result Ajit pawar Group : अटीतटीच्या ठरलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत अजित पवार गटाच्या दोन्ही उमेदवारांचा विजय झाला आहे. अजित पवार गटाचे राजेश विटेकर हे २३ तर शिवाजीराव गर्जे हे २४ मते घेऊन विजयी झाले आहेत. लोकसभेतील पराभवानंतर अजित पवार गटाचा हा पहिलाच मोठा विजय आहे. दरम्यान, अजित पवार गटाकडे ४२ आमदार असतानाही त्यांना ४७ मते मिळाली आहेत. त्यामुळे ही उर्वरित पाच मते कोणाची मिळाली असा प्रश्न निर्माण झाला आहे. "काही पुढचे राऊंड झाले तरीही महायुतीचे सर्व ९ उमेदवार निवडून येण्यास काही अडचण नाही. एकंदरीतच या निवडणुकीवर महाराष्ट्राचं लक्ष होतं. सातत्याने वेगवेगळ्या बातम्या पसरवल्या जात होत्या. आमच्याकडेही ४२ मते होती. परंतु, त्यापेक्षा अधिक मतदारांनी आमदारांनी शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकरांना दिली. त्यासाठी सर्व आमदारांचे आभार मानतो. त्यांनी टाकलेल्या विश्वासाला हे दोघेही विधीमंडळात काम करतील. पक्षाची आणि जनतेची भूमिका मांडून प्रश्न सोडवतील", अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निकाल स्पष्ट झाल्यानंतर (Vidhan Parishad Election Result ) दिली. हेही वाचा >> विधान परिषद निवडणूक निकाल : पंकजा मुंडेंसह भाजपाच्या पाचही उमेदवारांचा विजय "पुढचे राऊंड झाले तरीही महायुतीचे सर्व ९ उमेदवार निवडून येण्यास काही अडचण नाही. एकंदरीतच या निवडणुकीवर महाराष्ट्राचं लक्ष होतं. सातत्याने वेगवेगळ्या बातम्या पसरवल्या जात होत्या. आमच्याकडेही ४२ मते होती. परंतु, त्यापेक्षा अधिक मतदारांनी आमदारांनी शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकरांना दिली. त्यासाठी सर्व आमदारांचे आभार मानतो. त्यांनी टाकलेल्या विश्वासाला हे दोघेही विधीमंडळात काम करतील. पक्षाची आणि जनतेची भूमिका मांडून प्रश्न सोडवतील", असं अजित पवार म्हणाले. "महायुतीची एक युनिटी यातून महाराष्ट्राला पाहायाला मिळाली. इथून पुढेही विधानसभेच्या निवडणुकीत अशाच पद्धतीची एकी ठेवून महायुतीचं सरकार आपल्या राज्यात निवडून आणण्याकरता परिश्रम करू. महायुतीच्या उमेदवारांना मतदान केलंय त्या सर्वांचे आभार मानतो आणि निवडून आलेल्या सर्वांचे अभिनंदन करतो. ही निवडणूक बिनविरोध होईल असं वाटलं होतं, पण एक अधिक उमेदवार आला आणि एक वेगळा रंग चढला, आता निकाल आल्यानंतर चित्र स्पष्ट झालं आहे. खूप मोठ्या संख्येने महायुतीचे आमदार विधान परिषदेत निवडून गेले आहेत", असंही ते पुढे म्हणाले. घड्याळाची विजयी सलामी ! महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही उमेदवार श्री. शिवाजीराव गर्जे आणि श्री. राजेश विटेकर यांनी आपली विजयी पताका रोवली. या दणदणीत विजयाबद्दल मी आमच्या दोन्ही शिलेदारांचं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व सहकारी… pic.twitter.com/Edh4BwszNY— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 12, 2024 "कोणतेही वेडवाकडे प्रकार घडू न देता अतिशय लोकशाही पद्धतीने ही निवडणूक पार पाडण्याचा प्रयत्न महायुतीने केला, याचं मनापासून समाधान मला आहे", असंही त्यांनी स्पष्ट केलं. 9/9 ? #MLCElection #VidhanParishad #Maharashtra— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 12, 2024 राष्ट्रवादीला मिळाली ४७ मते "आमच्याकडे एकूण ४२ मतदार होते. परंतु आम्हाला ४७ मते मिळाली आहेत. त्यामुळे आम्हाला पाच मतदार जास्त मिळाले. पाच अधिक मतदारांनी पाठिंबा दिला आहे. निवडणूक असतात तेव्हा आरोपही होतात. पण आपण आरोपांकडे लक्ष द्यायचं नसतं, आपण फक्त विकासाकडे लक्ष द्यायचं", असं ते म्हणाले.