काशीद येथे पूल कोसळला ; अलिबाग-मुरुड वाहतूक विस्कळीत!

दोन वाहने देखील कोसळली मात्र सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही

Bridge collapses at Kashid
जीर्ण झाला आहे त्यामुळे पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी वारंवार केली जात होती.

अलिबाग-मुरुड मार्गावर काशीद येथील छोटा पूल कोसळला आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. आज (रविवार) रात्री आठ वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

जीर्ण झालेला हा पूल अतिवृष्टीमुळे कोसळला असल्याचे सांगण्यात आले आहे. यावेळी पूलावरील दोन वाहने देखील कोसळली मात्र सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. सहा जणांना वाहनांमधून सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. तर, वाहनं देखील  बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान या मार्गावरील वाहतूक सुपेगाव मार्गे वळविण्यात आली आहे. पूल जीर्ण झाला आहे त्यामुळे पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bridge collapses at kashid alibag murud traffic disrupted msr

Next Story
नाकर्त्यां लोकप्रतिनिधींमुळे पूरग्रस्त अन्नछत्रात!