१५ लाखांच्या हुंड्यासाठी पतीकडून पत्नीला सामूहिक बलात्काराची धमकी

पीडित महिलेची पोलिसात तक्रार

प्रतीकात्मक छायाचित्र
सासरच्या मंडळींनी १५ लाख रुपये हुंडा मागत सुनेचा मानसिक आणि शारिरीक छळ केला. तसेच १५ लाख रुपये हुंडा दिला नाही तर सामूहिक बलात्काराची धमकी पतीनेच दिली असल्याची तक्रार पीडित महिलेने दिली आहे. पिंपरीतील पिंपळे निळख परिसरात ही धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडीत महिलेने पोलीस ठाण्यात जाऊन दाद मागितली आहे. तसेच सासरच्या मंडळींविरोधात तक्रार नोंदवली असून याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपळे निळख या भागात राहणाऱ्या एका विवाहितेने तिच्या सासरच्या मंडळींविरोधात आणि पतीविरोधात हुंड्यासाठी छळ केल्याची तक्रार दिली आहे. सासू, सासरे, पती आणि नणंद या सगळ्यांनी फ्लॅट घेण्यासाठी १५ लाख रुपये तुझ्या माहेरून घेऊन ये असा तगादा माझ्यामागे लावला. मी पैसे आणले नाहीत तेव्हा माझा मानसिक आणि शारिरीक छळ केला असे या पीडितेने म्हटले आहे. माझ्या पतीने हुंड्याच्या मागणीसाठी मला वारंवार मारहाणही केली आहे. तसेच मला जीवे मारण्याची धमकी देत सामूहिक बलात्काराचीही धमकी दिल्याचे या पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. ही पीडित महिला सध्या एका भाड्याच्या खोलीत रहात असून पोलीस उपनिरीक्षक संभाजी पाटील हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bring 15 lakh dowry or otherwise i will kill you husband threatens his wife

ताज्या बातम्या