केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडताना अनेक घोषणांचा पाऊस पाडला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प दशकाला दिशा देणारा असल्याचं सांगत कौतुक केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्पावर टीका करत निर्मला सीतारामन यांनी धूळ’फेकू’ योजनांचा पाढा वाचला असल्याचं म्हटलं आहे.

धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे की, “अनेक सरकारी कंपन्या विकायला काढलेल्या असताना, सरकारी तिजोरी खाली असताना शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू यासारख्या धूळ’फेकू’ योजनांचा पाढा निर्मला सीतारामन यांनी वाचला. घसरणारी आकडेवारी वेगळं सूचित करत असताना, केलेल्या घोषणांवर विश्वास ठेवायचा कसा? अर्थसंकल्पाने घोर निराशा केली आहे”.

आणखी वाचा – Budget 2020 : जाणून घ्या, अर्थसंकल्पात कोणत्या क्षेत्रासाठी किती रुपयांची आहे तरतूद?

पुढे त्यांनी म्हटलं आहे की, “देश आर्थिक मंदीच्या खाईत लोटला गेला आहे. कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहे. बेरोजगारी वाढली, उद्योगधंदे बंद झाले आहेत. धर्माधर्मात फूट पाडली जात आहे. अशात अर्थव्यवस्थेतील मरगळ दूर करण्यात फेल ठरला आहे. हा अर्थसंकल्प स्वागतार्ह नाही. मोदी सरकारने घोर निराशा केली आहे”.