विरारमध्ये चाळ बिल्डरची हत्या

पहाटे ३ वाजता मंदिरात पुजा करण्यासाठी निघाले असता अज्ञातांनी चाकूने वार करत हत्या केली

Builder, Death, Virar,
पहाटे ३ वाजता मंदिरात पुजा करण्यासाठी निघाले असता अज्ञातांनी चाकूने वार करत हत्या केली

विरारमधील चाळ बिल्डर निशांत कदम (३१) याची सोमवारी पहाटे अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली. श्रावणी सोमवार निमित्त मंदिरात जात असताना दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर वार करून त्यांची हत्या केली.

निशांत कदम (३१) हा चाळ बिल्डर असून त्याची एन.के.एण्टरप्राईजेस नावाची बांधकाम कंपनी आहे. तो विरार पुर्वेच्या सहकार नगर मध्ये राहत होता. श्रावण असल्याने दर सोमवारी पहाटे शंकराच्या मंदिरात पूजा करण्यासाठी जात असे. सोमवारी पहाटे अडीच वाजता मंदिरात जाण्यासाठी मोटारसायकलीवरून निघाला होता. मात्र गांधी चौकात दबा धरलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केली. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

कदम याने या परिसरात अनेक चाळी बांधल्या होत्या. त्याचे इतर चाळ बिल्डरांशी वाद होते. सहकार नगर येथील एका जागेसंदर्भात कदम याचे काही जणांशी वाद होते असी तक्रार मयत बिल्डर कदमच्या भावाने पोलिसांना दिली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Builder stabbed to death in virar sgy

ताज्या बातम्या