bus carrying tourists from nepal fall into farm in sawantwadi zws 70 | Loksatta

नेपाळची बस सावंतवाडी बावळट येथे कलंडली

हे पर्यटक बसने गोवा येथून नेपाळ येथे परतत असताना हा अपघात घडला.

नेपाळची बस सावंतवाडी बावळट येथे कलंडली
बसचे उतारावर ब्रेक फेल झाल्यामुळे ती रिव्हर्स घेताना थेट लगतच्या बावळट रस्त्यावर शेतात कोसळली

सावंतवाडी : नेपाळ येथील पर्यटकांची बस सावंतवाडी तालुक्यातील बांदा ते आंबोली जाणाऱ्या रस्त्यावर बावळट येथे कलंडली, मात्र पर्यटकांना किरकोळ दुखापती झाल्या. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.

नेपाळ येथील पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या बसचे उतारावर ब्रेक फेल झाल्यामुळे ती रिव्हर्स घेताना थेट लगतच्या बावळट रस्त्यावर शेतात कोसळली. बांदा दाणोली जिल्हा मार्गावर बावळट – मुलांडावाडी येथे गुरुवारी रात्री १० च्या सुमारास झालेल्या या अपघातात तीन पर्यटक जखमी झाले. हे पर्यटक बसने गोवा येथून नेपाळ येथे परतत असताना हा अपघात घडला.

या अपघातात निशा खडका (वय २२) आणि साधना सोनी (वय ३२) जखमी झाले असुन या पर्यटकांमध्ये एका गर्भवती महिलेचाही समावेश होता. या घटनेची माहिती मिळताच साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अजित घाडी, हेड पोलीस कॉन्स्टेबल मयूर सावंत तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी स्थानिक ग्रामस्थ व अन्य वाहनचालकांच्या मदतीने प्रवाशांना बसमधून बाहेर काढत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठविले.

दरम्यान, हा अपघात झाल्यानंतर प्रवाशांनी चालकाला जबाबदार धरल्यानंतर काही वेळाने बसचालकाने घटनास्थळावरून पलायन केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 03:25 IST
Next Story
विजय दिवस सोहळ्यात यंदा भरगच्च कार्यक्रम; रौप्यमहोत्सवानिमित्त संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, शरद पवार यांना निमंत्रण