बल्लारपुरात कोळसा व्यावसायिकाची गोळय़ा घालून हत्या

वर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने नागरिकांत दहशतीचे वातावरण आहे.

प्रतिकात्मक

चंद्रपूर :  बल्लारपूर शहरातील मुख्य मार्गावरील जुन्या बस स्थानकाजवळील नगर पालिकेच्या गांधी मार्केटजवळ  शनिवारी दुपारी तीन वाजता अवैध कोळसा व दारूविक्रीत सक्रीय सुरज बहुरिया (३५) या युवकाची बंदुकीच्या गोळय़ा झाडून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

वर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने नागरिकांत दहशतीचे वातावरण आहे. जुना बस स्टॅन्ड परिसरात बल्लारपूरकडून बामणीकडे जात असताना चारचाकी गाडीत बसून जात असताना सुरज बहुरिया याच्यावर चौकात गोळीबार केला गेला. घटनेची माहिती मिळताच बल्लारपूर पोलिसांनी धाव घेतली. यावेळी सुरज घटनास्थळी रक्ताच्या थारोळय़ात पडून होता. त्याला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता प्रकृती चिंताजनक असल्याने चंद्रपूरच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु रस्त्यात सुरज बहुरिया याची प्राणज्योत मालवली. त्याच्यावर एकूण सहा गोळय़ा झाडण्यात आल्या. त्याला तीन ते चार गोळय़ा लागल्या होत्या.

दरम्यान सुरज बहुरियाच्या समर्थकांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला. शहरात संतापाचे तसेच भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी दंगा नियंत्रक पथकाला पाचारण केले. अवैध कोळसा व मद्यविक्री व्यवसायाच्या स्पध्रेतून ही हत्या झाल्याची चर्चा  आहे. सुरज हा युवक काँग्रेसचा सक्रीय कार्यकर्ता होता. विशेष म्हणजे त्याचा उद्या वाढदिवस होता. सुपारी देऊन ही हत्या केल्याचेही बोलले जात आहे. घटनेनंतर अवघ्या काही तासात दोन आरोपी स्वत: पोलिसांना शरण आले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Businessman shot dead in in ballarpur city zws

ताज्या बातम्या