scorecardresearch

Premium

Cabinet Meeting : फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मुक्काम, जेवायला हजारो रुपयांची थाळी; वडेट्टीवारांनी यादीच केली जाहीर

“राजा खातोय तुपाशी, शेतकरी मात्र उपाशी. सरकारने जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी. विश्रांतीला फाईव स्टार हॉटेल, जेवायला १५०० रुपयांची थाळी… दुष्काळग्रस्त भागासाठी कॅबिनेट बैठक आहे की महायुतीच्या मंत्र्यांचे पर्यटन?”, असंही ते म्हणाले.

vijay wadettiwar
काय म्हणाले विजय वडेट्टीवार? (फोटो – विजय वडेट्टीवार / ट्विटर)

मराठा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीसाठी संपूर्ण मंत्रिमंडळ मराठवाड्यात दाखल होणार आहे. या मंत्र्यांच्या राहण्याची, खाण्याची सोय करण्याकरता सरकारने लाखो रुपये खर्ची केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. मंत्रिमंडळ बैठकीसाठी नम्रता कॅटर्सला जेवणाचं कंत्राट देण्यात आले असून, एका थाळीची किंमत १ हजार ते दीड हजार असणार आहे, असा दावा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यांनी ट्वीट करून ही माहिती दिली.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, “सरकारने जनाची नाही तर मनाची लाज बाळगली पाहिजे. १७ तारखेला होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत मंत्री मराठवाड्यात पर्यटनासाठी येत आहेत का असा प्रश्न आहे. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये व्यवस्थापन करणारं हे पहिलं सरकार आहे. सर्वाधिक आत्महत्या मराठवाड्यात होत आहेत. सरासरी प्रत्येक जिल्ह्यात मागच्या ऑगस्टमध्ये १००- सव्वाशे आत्महत्या झाल्या आहेत. शेतकरी त्रस्त आहे. ९६ तालुके दुष्काळाच्या छायेत आहेत. मराठवाडा दुष्काळाच्या छायेत असातना फाईव्ह स्टार व्यवस्था करून कॅबिनेट बैठक घेण्याची गरज का पडली हा खरा प्रश्न आहे.”

मुंबई : रस्ते फर्निचर कामासाठी नव्याने निविदा प्रक्रिया?लोकायुक्तांकडे सुनावणी सुरू असताना २११ कोटींचा नवा प्रस्ताव
Raju Shetty news
केंद्र सरकारची उसाच्या एफआरपीची वाढ तोकडी; राजू शेट्टी यांची टीका
Prime Minister Modi firm assertion that the scheme is for the benefit of farmers
योजना शेतकरी हिताच्याच! पंतप्रधान मोदी यांचे ठाम प्रतिपादन
Jalgaon people morcha
या मोर्चेकऱ्यांच्या घोषणांनी जळगाव दुमदुमले, प्रलंबित प्रश्‍नांसाठी लोकसंघर्षचा बिर्‍हाड मोर्चा

हेही वाचा >> “या सरकारचं थाटामाटात अंत्यसंस्कार करणार”, संजय राऊतांचं वक्तव्य; म्हणाले, “तीन तासांसाठी…”

“कॅबिनेटच्या नावाखाली मौजमस्ती करायला तर हे सरकार येत नाहीये ना असा विषय चर्चेला आला आहे. यापूर्वी कॅबिनेटच्या बैठका झाल्या, पण मंत्री कधीही फाईव्ह स्टारमध्ये थांबले नव्हते. फाईव्ह स्टारचा पाहुणचार घेतला नव्हता. विश्वासराव देशमुख, अशोक चव्हाण किंवा यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी बैठका घेतल्या तेव्हा गेस्ट हाऊसमध्ये थांबून बैठका घेतल्या. हाजोर थाळ्यांची जेवणाची प्लेट, पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्काम आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू आहेत. सरकाराल जनाची नाही पण मनाची लाज वाटत असेल तर जरा तरी विचार करावा. फडणवीस सरकारने २०१६ ला दिलेलं पॅकेज मराठावाड्यातील जनता विसरली नाही. ५० हजार कोटीच्या पॅकेजचं काय झालं? मराठवाड्यातील जनता अशा नालायक सरकारला माफ करणार नाही, असंही वडेट्टीवार म्हणाले.

हेही वाचा >> “कुठे गेल्या गायी-म्हशी? गोमांसभक्षक संघ कार्यकर्त्यांकडे…”, संजय राऊतांचं सरकारवर टीकास्र

“राजा खातोय तुपाशी, शेतकरी मात्र उपाशी. सरकारने जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी. विश्रांतीला फाईव स्टार हॉटेल, जेवायला १५०० रुपयांची थाळी… दुष्काळग्रस्त भागासाठी कॅबिनेट बैठक आहे की महायुतीच्या मंत्र्यांचे पर्यटन?”, असंही ते म्हणाले.

मंत्र्यांच्या खर्चाची यादीच केली जाहीर

फाईव स्टार हॉटेल 30 रूम बुक (मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री)
ताज हॉटेल 40 रूम बुक (सर्व सचिव)
अमरप्रीत हॉटेल 70 रूम बुक (उपसचिव, खासगी सचिव, कक्ष अधिकारी)
अजंता अॅम्बेसेडर 40 रूम बुक (उपसचिव, खासगी सचिव, कक्ष अधिकारी)
महसूल प्रबोधिनी 100 रूम (सुरक्षा रक्षक, वाहनचालक)
पाटीदार भवन 100 (सुरक्षा रक्षक, वाहनचालक)
वाल्मी, सिंचन, महावितरण, सुभेदारी विश्रामगृहे – 20 ( इतर अधिकारी)
एकूण 150 गाड्या नाशिक येथून भाड्याने घेण्यात आल्या आहेत.
औरंगाबाद शहरातील देखील 150 गाड्या भाड्याने घेण्यात आल्या आहेत.
मंत्रिमंडळ बैठकीसाठी नम्रता कॅटर्सला जेवणाचं कंत्राट देण्यात आले असून, एका थाळीची किंमत 1 हजार ते दीड हजार असणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cabinet meeting stay in five star hotel plate of thousands of rupees for food vadettivar announced the list sgk

First published on: 15-09-2023 at 15:46 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×